अफगाणिस्तानातील तीव्र संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर युरोप निर्वासितांच्या लोंढ्यांचे नवे संकट पेलू शकणार नाही

- ग्रीसचे मायग्रेशन मिनिस्टर मिताराची यांचा इशारा

अथेन्स/ब्रुसेल्स – युरोपिय महासंघ 2015 साली आलेल्या निर्वासितांच्या लोंढ्यांप्रमाणे पुन्हा नव्या लोंढ्यांना सामावून घेण्यास अजिबात तयार नाही, असा इशारा ग्रीसचे मायग्रेशन मिनिस्टर नोतिस मिताराची यांनी दिला आहे. अफगाणिस्तानातून येणाऱ्या लोंढ्यांना रोखण्यासाठी युरोपिय महासंघाने तुर्कीला अधिक सहाय्य पुरवावे, असा सल्लाही ग्रीसच्या मंत्र्यांनी दिला. ग्रीसच्या मंत्र्यांकडून इशारा दिला जात असतानाच, जर्मनी व नेदरलॅण्ड्स या आघाडीच्या देशांनी अफगाणी निर्वासितांची हकालपट्टी करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

अफगाणिस्तानातील तीव्र संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर युरोप निर्वासितांच्या लोंढ्यांचे नवे संकट पेलू शकणार नाही - ग्रीसचे मायग्रेशन मिनिस्टर मिताराची यांचा इशाराअफगाणिस्तानात तालिबानचे वर्चस्व अधिकाधिक वाढत असून 50 टक्क्यांहून अधिक देश तालिबानच्या ताब्यात गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर अफगाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात देश सोडण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीच्या संघर्षाची पार्श्‍वभूमी लक्षात घेता, अफगाणी नागरिक युरोपिय देशांमध्येही दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रीसच्या मंत्र्यांनी इशारा देत युरोपला निर्वासितांचे नवे लोंढे व त्यातून निर्माण झालेले संकट पेलता येणार नाही, असे बजावले आहे.

गेल्या महिन्यात अफगाणिस्तान सरकारने युरोपिय देशांनी अफगाण निर्वासितांची हकालपट्टी काही महिन्यांकरता थांबवावी, अशी विनंती केली होती. तालिबानचे वाढते हल्ले व कोरोनाची साथ यामुळे परिस्थिती योग्य नसल्याचे कारण अफगाण सरकारकडून पुढे करण्यात आले होते. युरोपिय महासंघातील काही देशांनी अफगाणी निर्वासितांना माघारी पाठविण्याची प्रक्रियाही चालू ठेवावी, अशी भूमिका मांडली होती. यासंदभातील पत्रावर ग्रीसनेही स्वाक्षरी केली आहे.अफगाणिस्तानातील तीव्र संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर युरोप निर्वासितांच्या लोंढ्यांचे नवे संकट पेलू शकणार नाही - ग्रीसचे मायग्रेशन मिनिस्टर मिताराची यांचा इशारा

2015 साली व त्यानंतर जर्मनीने आखात व आशियातून येणाऱ्या निर्वासितांसाठी ‘ओपन डोअर पॉलिसी’ जाहीर केली होती. त्याचा फायदा उठवून 10 लाखांहून अधिक निर्वासितांनी युरोपिय महासंघात घुसखोरी केली होती. त्याचे विपरित परिणाम युरोपियन संस्कृती व मूल्यांवर झाले असून युरोपची सुरक्षाही धोक्यात आली आहे. या संकटातून युरोप अद्याप सावरलेला नाही, याची आठवण ग्रीसच्या मंत्र्यांनी करून दिली.

ग्रीसपूर्वी ऑस्ट्रियानेही निर्वासितांच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. अफगाणिस्तानसारखे देश निर्वासितांचा शस्त्र म्हणून वापर करीत असून त्याविरोधात युरोपिय महासंघाने कारवाई करावी, अशी आग्रही मागणी ऑस्ट्रियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली होती.

leave a reply