कोरोनाचा उगम चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच झाल्याचे सबळ पुरावे

- अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ

वॉशिंग्टन – ‘परिस्थितीजन्य पुरावे व चीनच्या राजवटीकडून प्रयोगशाळेसंदर्भातील माहिती दडपण्यासाठी चाललेले जोरदार प्रयत्न या दोन गोष्टी कोरोना व्हायरसचा उगम चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतच झाल्याचे दाखवून देतात. याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पर्यायाचे समर्थन करणारे पुरावे समोर आलेले नाहीत’, या शब्दात अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी कोरोनाची साथ चीनच्या प्रयोगशाळेतूनच उगम पावल्याचा पुनरुच्चार केला. यावेळी त्यांनी जैविक युद्धाच्या शक्यतेकडेही लक्ष वेधले असून जैविक शस्त्रे व जैविक दहशतवादाचा धोका वाढल्याचा गंभीर इशारा दिला.

कोरोनाचा उगम चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच झाल्याचे सबळ पुरावे - अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ२०१९ साली कोरोनाच्या साथीची सुरुवात झाल्यापासून चीनची याबाबतची भूमिक संशयास्पद राहिली आहे. आपल्यावर ठेवण्यात येणारा ठपका टाळण्यासाठी चीनने कोरोनाव्हायरसची माहिती सातत्याने दडपून ठेवली. तसेच त्याचा उगम इतर देशांमध्ये झाल्याचे फुटकळ दावेही प्रसिद्ध केले. कोरोनाच्या साथीबाबत बोलणार्‍या चिनी संशोधकांची बोलती बंद करण्यात आली. अनेक पत्रकारांनाही गायब करण्यात आले होते.

चीनकडून सुरू असणार्‍या या प्रयत्नांच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका व युरोपिय देशांसह जगातील प्रमुख देशांनी कोरोनाव्हायरसचा उगम चीनमधूनच झाल्याचा ठपका ठेवला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहान लॅबमधूनच झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अमेरिकेच्या अनेक वरिष्ठ नेते, अधिकारी तसेच संशोधकांनी वुहान प्रयोगशाळेकडेच बोट दाखविले होते. चीनमधून बाहेर पडलेल्या एका संशोधिकेनेही आपल्याकडे यासंदर्भात पुरावे असल्याचे जगजाहीर केले होते.

कोरोनाचा उगम चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच झाल्याचे सबळ पुरावे - अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओकाही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या संसद सदस्यांनी, कोरोनाव्हायरस चीनच्या वुहान प्रयोगशाळेतून पसरला, या दाव्याची अमेरिकेने चौकशी करावी तसेच त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे संसदेसमोर खुली करावीत, अशी आग्रही मागणी केली होती. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री तसेच गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चे माजी प्रमुख असणार्‍या पॉम्पिओ यांनी त्याचा पुनरुच्चार करणे महत्त्वाचे ठरते. ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फक्त वुहानमधील प्रयोगशाळेचा उल्लेख करून न थांबता पॉम्पिओ यांनी जैविक युद्धाबाबतही इशारा दिला.

‘कोरोनासारखी भयानक साथ वुहानमधील प्रयोगशाळा किंवा चीनच्या इतर कोणत्याही प्रयोगशाळेतून पुन्हा पसरविली जाण्याचा धोका खूपच वाढला आहे. चीनच्या राजवटीकडून तशा कारवाया सुरू आहेत. या भागातून जैविक शस्त्रे व जैविक दहशतवादाशी संबंधित घटना घडण्याची शक्यता वास्तवात उतरु शकते. जैविक युद्धाचीही शक्यता नाकारता येणार नाही’, असे पॉम्पिओ यांनी बजावले आहे.

काही दिवसांपूर्वी ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो यांनी कोरोनाव्हायरस म्हणजे चीनच्या जैविक युद्धाचा भाग असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील एका आघाडीच्या दैनिकाने, चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने २०१५ सालीच, कोरोनाव्हायरसचा तिसर्‍या महायुद्धात जैविक शस्त्रासारखा वापर करण्याची कुटील योजना आखल्याची बातमी देऊन जगभरात खळबळ माजविली होती.

leave a reply