केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार संपन्न

- 43 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून बुधवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. नव्या मंत्र्यांमध्ये कॅबिनेट दर्जाच्या 15 व 28 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू होती. महिला व ईशान्येकडील राज्यांना मंत्रिमंडळात मिळालेले प्रतिनिधित्त्व हा माध्यमांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार संपन्न - 43 मंत्र्यांचा शपथविधी पार पडलाराष्ट्रपती भवनात बुधवारच्या सायंकाळी पार पडलेल्या या समारोहात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या मंत्र्यांना शपथ दिली. नारायण राणे, सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य सिंदिया, विरेंद्र कुमार, रामचंद्र प्रताप सिंग, किरेन रिजिजू, अश्‍विनी वैष्णव, पशुपतीनाथ पारस, आर.के. सिंग, हरदीप सिंग पुरी, मनसुख मांडविया, भूपेंद्र यादव, पी. रूपाला, जी. किशन रेड्डी आणि अनुराग सिंग ठाकूर यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

मिनाक्षी लेखी, पंकज चौधरी, अनुप्रिया पटेल, ए. पी. बाघेल, आर. चंद्रशेखर, शोभा करंदलाजे, भानुप्रताप सिंग वर्मा, दर्शना जरदोश, अन्नपूर्णा देवी, ए. नारायण स्वामी, कौशल किशोर, अजय भट, बी. एल. वर्मा, देवू सिंग चौहान, भगवंत खुबा, कपिल पाटील, प्रतिमा भौमिक, सुभाष सरकार, अजय कुमार, डॉ. भगवत कराड, राजकुमार सिंग, भारती पवार, बिश्‍वेश्‍वर तुडू, शंतनु ठाकूर, एम. महेंद्रभाई, जॉन बरला, एल. मुरूगन आणि निशीत प्रमाणिक यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

दरम्यान, नव्या मंत्र्यांना मिळालेल्या खात्यांची रात्री उशीरापर्यंत अधिकृत पातळीवर माहिती उपलब्ध झाली नव्हती. पण आरोग्य व रसायने आणि खते विभागाचे कॅबिनेट मंत्रीपद मनसुख मंडाविया यांना मिळाल्याची माहिती समोर आली होती. तर ज्योतिरादित्य सिंदिया यांना नागरी उड्डयन मंत्रायल, अश्‍विनी वैष्णव यांना रेल्वे, तंत्रज्ञान व संपर्क मंत्रालय मिळाले आहे. नारायण राणे यांना लघुउद्योग तर अनुराग ठाकूर यांना माहिती व दूरसंचार मंत्रालय मिळाल्याचे सांगितले जाते.

आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना बंदर, नौकावहन आणि आयुष्य मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर पियूष गोयल यांना वस्त्रोद्योग आणि स्मृती इराणी यांच्याकडे महिला व बालकल्याण मंत्रालय सोपविण्यात आले आहे. याबरोबरच स्वच्छ भारत अभियानाची जबाबदारीही स्मृती इराणी यांच्याकडे देण्यात आली आहे.

हरदीप सिंग पुरी यांच्याकडे पेट्रोलिय मंत्रालय व धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे शिक्षण व कौशल्य विकास मंत्रालय सोपविण्यात आल्याचे सांगितले जाते. पशुपती पारस अन्न प्रक्रिया मंत्रालय व पी. रूपाला यांच्याकडे मत्स्योद्योग व दुग्धोत्पादन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर भूपेंद्र यादव नवे कामगार मंत्री होणार असल्याची माहिती माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली होती. तर मिनाक्षी लेखी परराष्ट्र व सांस्कृतिक मंत्रालयाच्या राज्यमंत्री बनल्याचा दावा केला जातो.

leave a reply