अफगाणिस्तानातील चार स्फोटांमध्ये 19 जणांचा बळी

19 जणांचा बळीकाबुल – अफगाणिस्तानची राजधानी काबुल आणि मझार-ए-शरीफ येथे झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये 19 जणांचा बळी गेला. ‘आयएस’ने यातील काही हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील मझार-ए-शरीफ प्रांतातील तीन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रवासी मिनीवॅनमध्ये बॉम्ब पेरण्यात आले होते. काही मिनिटांच्या अंतराने घडविलेल्या या बॉम्बस्फोटात दहा प्रवाशांचा बळी गेला. यामध्ये तीन महिलांचा समावेश होता. ‘आयएस’ने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली.

बुधवारी उशीरा काबुलमधील प्रार्थनास्थळात झालेल्या स्फोटात नऊ जण ठार, तर 18 जण जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारली नसली तरी यामागे ‘आयएस‘ असल्याचा संशय व्यक्त केला जातो.

leave a reply