रशियाच्या ‘वॉर मशिन’ला लक्ष्य करण्यासाठी ‘जी७’ देशांकडून नव्या व्यापक निर्बंधांची घोषणा

हिरोशिमा/मॉस्को – रशिया आपल्या युद्धसज्जतेसाठी वापर करणाऱ्या तंत्रज्ञानासह मशिनरी व उत्पादन क्षेत्रातील अनेक घटकांवर निर्बंध लादत असल्याची घोषणा ‘जी७’ गटाने केली आहे. जपानमध्ये झालेल्या ‘जी७’च्या बैठकीत युक्रेनला देण्यात येणारे आर्थिक, लष्करी व राजनैतिक पातळीवरील सहाय्य दीर्घकाळासाठी कायम ठेवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. बैठकीदरम्यान युक्रेनला लढाऊ विमाने पुरविण्याच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

रशियाच्या ‘वॉर मशिन’ला लक्ष्य करण्यासाठी ‘जी७’ देशांकडून नव्या व्यापक निर्बंधांची घोषणागेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात होण्यापूर्वीच अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादण्यास सुरुवात केली होती. त्याला १५ महिन्यांहून अधिक काळ उलटल्यानंतरही या देशांकडून रशियाविरोधात निर्बंध लादण्याची कारवाई अद्याप सुरुच आहे. निर्बंध लादताना रशियाचा आर्थिक कणा मोडून युद्ध रोखण्यासाठी आक्रमक निर्णय घेण्यात येत असल्याचे दावे अमेरिका व सहकारी देशांनी केले होते.

मात्र दर महिन्याला नवे निर्बंध लादूनही रशियाकडून युक्रेनमध्ये सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला नाही. मे महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्येच रशियाने राजधानी किव्हसह युक्रेनच्या इतर भागांमध्ये तब्बल नऊवेळा क्षेपणास्त्र तसेच ड्रोन हल्ले चढवून आपली लष्करी ताकद दाखवून दिली आहे. रशियाच्या ‘वॉर मशिन’ला लक्ष्य करण्यासाठी ‘जी७’ देशांकडून नव्या व्यापक निर्बंधांची घोषणायाव्यतिरिक्त बाखमतसह युक्रेनच्या इतर शहरांवर रशियाकडून सातत्याने रणगाडे, तोफा, रॉकेटस्‌‍ व मॉर्टर्सचा मारा सुरू आहे. अजून किमान वर्षभर रशिया युद्ध लढू शकतो, अशी क्षमता रशियाकडे असल्याचे दावे रशियन अधिकाऱ्यांबरोबर पाश्चिमात्य देशांमधील विश्लेषकांनीही केले आहेत.

दुसऱ्या बाजूला रशियाची इंधन निर्यात, त्यातून मिळणारे उत्पन्न दर महिन्याला वाढत असल्याचे अहवाल आंतरराष्ट्रीय गटांकडून प्रसिद्ध होत आहेत. अमेरिकी माध्यमांनीही याला दुजोरा दिला आहे. रशियावर निर्बंध लादणाऱ्या देशांकडूनच त्यात पळवाटा शोधून आडमार्गाने रशियन इंधन व इतर उत्पादनांची आयात सुरू असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. या पार्श्वभूमीची जाणीव असतानाही ‘जी७’ देशांनी रशियाविरोधात नव्या निर्बंधांची घोषणा करून किमान या मुद्यावर आपण पिछाडीवर नसल्याचे दाखवून दिले आहे.

रशियाच्या ‘वॉर मशिन’ला लक्ष्य करण्यासाठी ‘जी७’ देशांकडून नव्या व्यापक निर्बंधांची घोषणानव्या निर्बंधांमध्ये मोठ्या उद्योगांसाठी लागणारी यंत्रे, तंत्रज्ञान व इतर कच्चा माल यांना लक्ष्य करण्यात आले आहे. ब्रिटनसारख्या देशांनी रशियातून आयात होणाऱ्या हिऱ्यांच्या व्यापारावर बंदी घालण्याचे संकेत दिले आहेत. रशिया युद्धसज्ज होईल अथवा त्याच्या लष्करी क्षमतेत भर पडेल असे सर्व घटक, उद्योग व व्यक्तींना लक्ष्य करण्यात येईल, असा इशारा ‘जी७’कडून देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी जी७ सदस्य देशांकडून रशियाला सहाय्य करणाऱ्या इतर देशांवर कारवाईचा बडगा उगारण्याच्या हालचालीही सुरू झाल्याचे वृत्त प्रसिद्ध्‌‍ झाले होते.

दरम्यान, ‘जी७’ नवे निर्बंध लादत असतानाच त्याचे आयोजन करणाऱ्या जपानने रशियाकडून करण्यात येणारी नैसर्गिक इंधनवायूची आयात वाढविण्याचे संकेत दिले आहेत.

हिंदी

 

leave a reply