अमेरिका व दक्षिण कोरियातील युद्धसराव म्हणजे ‘न्यूक्लिअर ब्लॅकमेल’

- उत्तर कोरियाचा आरोप

प्योनग्यँग – अमेरिका व दक्षिण कोरियामध्ये सुरू असणारे व्यापक युद्धसराव म्हणजे ‘न्यूक्लिअर ब्लॅकमेल’ असल्याचा आरोप उत्तर कोरियाने केला आहे. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेने लष्करी उपग्रह चाचणीच्या मुद्यावरून उत्तर कोरियाला इशारा दिला होता. त्याला प्रत्युत्तर देताना उत्तर कोरियाने ‘न्यूक्लिअर ब्लॅकमेल’चा ठपका ठेवला आहे.

अमेरिका व दक्षिण कोरियातील युद्धसराव म्हणजे ‘न्यूक्लिअर ब्लॅकमेल’ - उत्तर कोरियाचा आरोपमार्च महिन्यापासून अमेरिका व दक्षिण कोरियात व्यापक युद्धसराव सुरू आहेत. हे सराव गेल्या पाच वर्षातील सर्वात मोठे सराव असल्याची माहिती दोन्ही देशांकडून देण्यात आली आहे. अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौका, प्रगत बॉम्बर्स विमाने यात सहभागी झाली आहेत. दक्षिण कोरियानेही आपल्या प्रगत लढाऊ विमानांसह आधुनिक विनाशिकांना सरावात सामील केले आहे. या सरावादरम्यान शत्रूला लक्ष्य करण्यासाठीच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा अभ्यास करण्यात येत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून क्षेपणास्त्र चाचण्यांचा सपाटा लावणारा उत्तर कोरिया अणुचाचणीच्या तयारीपासून लक्ष भरकटविण्याचा प्रयत्न करीत असून नवा आरोपही त्याचाच भाग दिसत आहे. लवकरच किम जाँग-उन यांची राजवट सातवी अणुचाचणी घेईल, असा नवा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने नुकताच दिला होता. दक्षिण कोरियाच्या सीमेजवळ ही अणुचाचणी घेऊन उत्तर कोरिया आपल्या शेजारी देशासह अमेरिकेला इशारा देईल, असे अमेरिकन यंत्रणांचे म्हणणे आहे. अमेरिका व दक्षिण कोरियातील युद्धसराव म्हणजे ‘न्यूक्लिअर ब्लॅकमेल’ - उत्तर कोरियाचा आरोपअमेरिका व दक्षिण कोरियाच्या लष्करात होणाऱ्या आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या सरावाला उत्तर देण्यासाठी किम जाँग-उन यांची राजवट ही चाचणी घेणार असल्याचे सांगण्यात येते.

उत्तर कोरियाची ही अणुचाचणी या क्षेत्रात संघर्ष भडकविणारी ठरू शकते, असे इशारे आंतरराष्ट्रीय विश्लेषक देत आहेत. अमेरिका व दक्षिण कोरियन गुप्तचर तसेच सुरक्षा यंत्रणा देखील उत्तर कोरिया कोणत्याही क्षणी अणुचाचणी घेईल, असे बजावत आहेत. २००६ साली उत्तर कोरियाने सर्वात पहिली अणुचाचणी घेतली होती. त्यानंतर आत्तापर्यंत उत्तर कोरियाने सहा अणुचाचण्या घेतल्या असून प्रत्येकी अणुचाचणीची तीव्रता वाढवत नेली आहे. त्यामुळे उत्तर कोरियाची सातवी अणुचाचणी देखील तितकीच शक्तीशाली आणि हादरविणारी ठरेल, असा दावा केला जातो.

हिंदी

 

leave a reply