अफगाणिस्तानमधील समस्येच्या पार्श्‍वभूमीवर ग्रीस अफगाणी निर्वासितांसाठी प्रवेशद्वार बनणार नाही

- ग्रीसचे मायग्रेशन मिनिस्टर मिताराची यांचा इशारा

अथेन्स/ब्रुसेल्स – ग्रीसला 2015 सालच्या निर्वासितांच्या संकटाची पुनरावृत्ती करायची नसून, यापुढे ग्रीस अफगाणी निर्वासितांसाठी युरोपचे प्रवेशद्वार बनणार नाही, असा खरमरीत इशारा मायग्रेशन मिनिस्टर नोतिस मिताराची यांनी दिला. अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळविला असून हजारो अफगाणी नागरिक देश सोडण्यासाठी धडपड करीत आहे. अफगाणी निर्वासितांचे हे लोंढे युरोपात धडकण्याचे संकेत मिळत असून त्याविरोधात काही युरोपिय देश आधीच आक्रमक झाले आहेत.

अफगाणिस्तानमधील समस्येच्या पार्श्‍वभूमीवर ग्रीस अफगाणी निर्वासितांसाठी प्रवेशद्वार बनणार नाही - ग्रीसचे मायग्रेशन मिनिस्टर मिताराची यांचा इशाराआखाती देश व अफगाणिस्तानात सुरू असणाऱ्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दशकात युरोपिय देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्वासित येण्यास सुरुवात झाली होती. 2015 साली व त्यानंतर जर्मनीने आखात व आशियातून येणाऱ्या निर्वासितांसाठी ‘ओपन डोअर पॉलिसी’ जाहीर केली होती. त्याचा फायदा उठवून 10 लाखांहून अधिक निर्वासितांनी युरोपिय महासंघात घुसखोरी केली होती. त्याचे विपरित परिणाम युरोपियन संस्कृती व मूल्यांवर झाले असून युरोपची सुरक्षाही धोक्यात आली आहे. त्यामुळे युरोपातील अनेक देश निर्वासितांना स्वीकारण्यास उघड विरोध करीत आहेत.

गेल्याच महिन्यात अफगाणिस्तान सरकारने युरोपिय देशांनी अफगाण निर्वासितांची हकालपट्टी काही महिन्यांकरता थांबवावी, अशी विनंती केली होती. तालिबानचे वाढते हल्ले व कोरोनाची साथ यामुळे परिस्थिती योग्य नसल्याचे कारण अफगाण सरकारकडून पुढे करण्यात आले होते. मात्र युरोपिय महासंघातील पाच देशांनी अफगाणी निर्वासितांना माघारी पाठविण्याची प्रक्रियाही चालू ठेवावी, अशी भूमिका मांडली होती. यात इटली व ग्रीससारख्या देशांचा समावेश आहे. त्याचवेळी जर्मनी व नेदरलॅण्ड्स या आघाडीच्या देशांनी अफगाणी निर्वासितांची हकालपट्टी करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला होता.

अफगाणिस्तानमधील समस्येच्या पार्श्‍वभूमीवर ग्रीस अफगाणी निर्वासितांसाठी प्रवेशद्वार बनणार नाही - ग्रीसचे मायग्रेशन मिनिस्टर मिताराची यांचा इशाराया घडामोडींमुळे युरोपात अफगाण निर्वासितांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मंगळवारी या मुद्यावर महासंघाची विशेष बैठकही आयोजित करण्यात आली आहे. याच पार्श्‍वभूमीवर ग्रीसच्या मंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडत इशारा दिला आहे. ‘ग्रीस यापुढे अफगाणिस्तानातून युरोपिय महासंघात दाखल होणाऱ्या निर्वासितांचे प्रवेशद्वार बनणार नाही. अफगाणिस्तानमधील लक्षावधी नागरिक देश सोडून युरोपात येऊ शकत नाही. ग्रीसच्या मार्गाने तर नक्कीच नाही’, असे ग्रीक मायग्रेशन मिनिस्टर नोतिस मिताराची यांनी बजावले. ग्रीस 2015 सालच्या निर्वासितांच्या संकटाची पुनरावृत्तीही घडू देणार नाही, असा इशाराही मिताराची यांनी दिला.

दरम्यान, जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी, जर्मनी किमान 10 हजार अफगाणींना देशात आश्रय देण्याचा प्रयत्न करेल, असे संकेत दिले आहेत. त्याचवेळी तुर्कीने इराणमधून अफगाणी नागरिकांचे लोंढ येऊ नयेत म्हणून सीमेवर भिंत उभारण्यास सुरुवात केल्याचे वृत्त समोर आले आहे.

leave a reply