अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात अर्ध्या टक्क्यांची वाढ

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याजदरात अर्ध्या टक्क्यांची वाढ करीत असल्याची घोषणा केली. ही दरवाढ गेल्या दोन दशकांमधील सर्वात मोठी वाढ ठरते. या घोषणेनंतर अमेरिकी डॉलरचे मूल्य घसरले असून कर्जरोख्यांवरील व्याजातही वाढ झाली आहे. अमेरिकेतील आघाडीच्या बँकांनी आपले दर वाढविले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्याजदरवाढीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. सुरुवातीच्या उसळीनंतर शेअरबाजारात घसरण सुरू झाली आहे, तर सोने व इंधनाच्या दरांमध्ये वाढ नोंदविण्यात आली.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात अर्ध्या टक्क्यांची वाढफेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी बुधवारी व्याजदरवाढीची घोषणा केली. अमेरिकेतील महागाई चार दशकांमधील सर्वोच्च स्तरावर भडकली असल्याचे सांगून ती नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे पॉवेल म्हणाले. अमेरिकी जनता व उद्योगांना पुन्हा स्थैर्य देण्यासाठी फेडरल रिझर्व्ह उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करील, असेही त्यांनी सांगितले. फेडरल रिझर्व्हन केलेली दरवाढ 2000 सालानंतरची सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या तीन महिन्यांमधील ही दुसरी वाढ ठरते. यापूर्वी मार्च महिन्यात व्याजदर 0.25 टक्क्यांनी वाढविण्यात आले होते. त्याचवेळी 0.75 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात दरवाढ करण्याची शक्यता पॉवेल यांनी फेटाळून लावली. मात्र येणाऱ्या काही महिन्यांमध्ये सातत्याने वाढ करण्यात येईल, असे संकेतही त्यांनी दिले.

फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीवर अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून संमिश्र प्रतिक्रिया उमटली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात अर्ध्या टक्क्यांची वाढअमेरिकेचे चलन डॉलरचे मूल्य 0.9 टक्क्यांनी घसरले आहे. ही गेल्या पाच वर्षातील सर्वात मोठी घसरण ठरते. अमेरिकेच्या कोषागार विभागाकडून विक्री करण्यात येणाऱ्या कर्जरोख्यांवरील व्याजदरातही वाड झाली आहे. फेडरल रिझर्व्हच्या घोषणेनंतर अमेरिकेतील आघाडीच्या बँकांनी कर्जाचे व्याजदर वाढविले आहेत. ‘जेपी मॉर्गन चेस’, ‘वेल्स फार्गो’ व ‘सिटी बँके’ने आपले व्याजदर चार टक्क्यांपर्यंत नेले आहेत.

व्याजदरातील या वाढीमुळे अमेरिकी जनतेला घर, वाहन व इतर गोष्टींसाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावर अधिक व्याज भरणे भाग पडणार आहे. याचे परिणाम अमेरिकेच्या गृहबांधणी तसेच ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या क्षेत्रात उमटण्याचे भाकित वर्तविण्यात आले आहे. घरासह इतर उत्पादनांची मागणी कमी होऊन जीडीपीची घसरण होण्याचीही शक्यता आहे. याचे रुपांतर पुढे आर्थिक मंदीत होऊ शकते, असा दावा विश्लेषक तसेच अर्थतज्ज्ञांनी केला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात अर्ध्या टक्क्यांची वाढअमेरिकेतील मागणी कमी झाल्याचा फटका जगातील विविध देशांना बसण्याचेही संकेत देण्यात आले आहेत.

फेडरल रिझर्व्हने केलेल्या वाढीचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उमटण्यास सुरुवात झाली आहे. ब्रिटनची मध्यवर्ती बँक ‘बँक ऑफ इंग्लंड’ने आपल्या व्याजदरात 0.25 टक्क्यांची वाढ केली. सौदी अरेबियासह आखातातील प्रमुख देश तसेच ऑस्ट्रेलियाकडूनह व्याजदरात वाढ जाहीर करण्यात आली. त्याचवेळी सोने व इंधनाच्या दरांमध्ये अर्ध्या ते एक टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले. सोन्याचे दर प्रति औंसामागे 1,900 डॉलर्सनजिक पोहोचले आहेत. तर कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरलमागे 110 डॉलर्सवर गेले आहेत.

दरम्यान, व्याजदरातील वाढीबरोबरच अमेरिकेतील वित्तीय बाजारपेठेत दर महिन्याला कर्जरोखे व सिक्युरिटीज्‌‍ची विक्री करण्याचा निर्णयही फेडरल रिझर्व्हने घेतला आहे. जून महिन्यापासून ही विक्री सुरू करण्यात येणार आहे.

leave a reply