इस्रायली विनाशिकेवर हमासचे रॉकेट हल्ले

तेहरान – भूमध्य समुद्रात तैनात असलेल्या इस्रायलच्या विनाशिकेवर रॉकेट हल्ले झाले आहेत. हमासच्या ‘अल-कासम ब्रिगेड’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. हमासच्या या हल्ल्यात इस्रायली विनाशिकेचे किती नुकसान झाले, याचे तपशील उघड झालेले नाहीत. पण हमासचे हल्ले या संघर्षाची तीव्रता अधिकच वाढविणारे ठरू शकतात, असा दावा पाश्‍चिमात्य माध्यमे करू लागली आहेत.इस्रायली विनाशिकेवर हमासचे रॉकेट हल्ले

गेल्या आठवड्यात हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरू केल्यापासून इस्रायलने गाझापट्टीची सीमा बंदी केली आहे. त्याचबरोबर हैफा शहराजवळच्या सागरी क्षेत्रात विनाशिका आणि गस्तीनौका तैनात केल्या आहेत. यापैकी गाझापट्टीच्या सागरी हद्दीजवळ गस्त घालणार्‍या इस्रायली विनाशिकेच्या दिशेने रॉकेट हल्ले चढविल्याचे अल-कासम ब्रिगेडने जाहीर केले. इस्रायलच्या विनाशिकेला लक्ष्य केल्याचा दावा हमासच्या या सशस्त्र संघटनेने केला आहे. पण इस्रायली लष्कराने याची माहिती उघड केलेली नाही. काही दिवसांपूर्वी अल-कासम ब्रिगेडने इस्रायलच्या ऍश्खेलॉन आणि किसूफिम येथील लष्करी तळांजवळही रॉकेट हल्ले चढविले होते.

leave a reply