चीनच्या पैशांमागे धावणार्‍या हॉलिवूड, एनबीए व अमेरिकी कंपन्यांचे हात रक्ताने माखले आहेत

- अमेरिकी पत्रकार जेक टॅपर यांचा आरोप

वॉशिंग्टन/बीजिंग – ‘अमेरिकेतील चित्रपटसृष्टी ‘हॉलिवूड’, क्रीडा संघटना ‘एनबीए’ व बहुराष्ट्रीय कंपन्यांना चीनमधून मिळणार्‍या आर्थिक लाभाने आंधळे केले असून, कम्युनिस्ट राजवटीकडून होणारे अत्याचार त्यांना दिसत नाहीत. कितीही महागडा साबण घेतला तरी त्यांच्या हाताला माखलेले रक्त कधीच निघणार नाही’ असा खरमरीत टोला अमेरिकी पत्रकार व वृत्तनिवेदक जेक टॅपर यांनी लगावला आहे. यावेळी टॅपर यांनी झिंजिआंगमधील उघूरवंशियांवर होणारे अत्याचार व टेनिसपटू पेंग शुईचा उल्लेख करून हॉलिवूड, एनबीए व अमेरिकी कंपन्यांना धारेवर धरले.

चीनच्या पैशांमागे धावणार्‍या हॉलिवूड, एनबीए व अमेरिकी कंपन्यांचे हात रक्ताने माखले आहेत - अमेरिकी पत्रकार जेक टॅपर यांचा आरोपगेली अनेक वर्षे ‘सीएनएन’ या वृत्तवाहिनीत कार्यरत असणार्‍या टॅपर यांनी रविवारी हॉलिवूडसह इतरांवर टीकास्त्र सोडले. ‘स्टेट ऑफ द युनियन’ नावाच्या कार्यक्रमात टॅपर यांनी चिनी टेनिसपटू पेंग शुई, उघूरवंशिय व चीनमधील मानवाधिकारांचा मुद्दा उपस्थित केला. ‘हॉलिवूड, एनबीए, आयओसी व वॉल स्ट्रीटवरील लक्षाधीश तसेच अब्जाधीश चीनच्या पैशांसाठी हपापलेले आहेत. त्यांना चीनच्या राजवटीकडून होणारे अत्याचार व मानवाधिकारंचे उल्लंघन दिसत नाही’, असा घणाघाती आरोप सीएनएनच्या निवेदकांनी केला.

चीनच्या पैशांमागे धावणार्‍या हॉलिवूड, एनबीए व अमेरिकी कंपन्यांचे हात रक्ताने माखले आहेत - अमेरिकी पत्रकार जेक टॅपर यांचा आरोप‘ऑलिंपिक राजकारणापासून मुक्त असावे, हा मुद्दा बरोबर आहे. पण चीनचा मुद्दा राजकारणाशी निगडित नाही. चीनच्या सत्ताधारी राजवटीवर होणारे आरोप पेंग शुईला देण्यात आलेल्या वागणुकीच्या तुलनेत अधिक गंभीर आहेत’, याकडे टॅपर यांनी लक्ष वेधले. यावेळी त्यांनी ‘वुमन्स टेनिस असोसिएशन’ने (डब्ल्यूटीए) घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. डब्ल्यूटीएचे अध्यक्ष स्टीव्ह सिमॉन यांनी पेंग शुईच्या सुरक्षेवर प्रश्‍न उपस्थित करणारे मोठे पत्रक प्रसिद्ध करून चीनचा निषेध केला होता. तसेच येत्या वर्षात चीन तसेच हॉंगकॉंगमध्ये आयोजित होणार्‍या महिलांच्या टेनिसस्पर्धा रद्द करण्याची घोषणा करून चीनला जबर धक्का दिला होता. मात्र अन्य संघटना तसेच इतर क्षेत्रांमधून अशा प्रकारची कारवाई झाली नाही, याबद्दल टॅपर यांनी नाराजी व्यक्त केली.चीनच्या पैशांमागे धावणार्‍या हॉलिवूड, एनबीए व अमेरिकी कंपन्यांचे हात रक्ताने माखले आहेत - अमेरिकी पत्रकार जेक टॅपर यांचा आरोप

अमेरिकेतील ‘ऍपल’, ‘नाईके’ व अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या झिंजिआंगमध्ये उभारण्यात आलेल्या उघूरवंशियांच्या छळछावण्यांमध्ये तयार झालेली उत्पादने अमेरिकी जनतेला विकत आहेत. उघडपणे ते ‘गुलाम कामगारां’च्या विरोधात बोलत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्याकडून तयार झालेल्या उत्पादनांमधून लक्षावधी डॉलर्सचा लाभ मिळवित आहेत, अशी टीका पत्रकार जेक टॅपर यांनी केली. आपल्या कार्यक्रमाच्या अखेरीस हॉलिवूडला लक्ष्य करताना हा उद्योग, चीनच्या सत्ताधारी राजवटीच्या आदेशांपुढे गुडघे टेकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अमेरिकेच्या संसदेनेही यापूर्वी बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच ‘एनबीए’ला पत्र लिहून फटकारले होते. मात्र त्यानंतरही हॉलिवूडसह अमेरिकेतील क्रीडा संघटना तसेच कंपन्या चीनच्या कलाने धोरण राबवित असल्याचे समोर आले आहे.

leave a reply