‘मोसाद’चे प्रमुख अमेरिकी राष्ट्राध्यक्षांची विशेष भेट घेणार

‘मोसाद’तेल अविव – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू देशाची मुख्य गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’चे प्रमुख योसी कोहेन यांना अमेरिकेला रवाना करणार आहेत. बायडेन प्रशासनासमोर इस्रायलची भूमिका मांडण्यासाठी कोहेन अमेरिकेचा दौरा करतील, अशी माहिती समोर येत आहे. इस्रायलच्या वृत्तवाहिनीने ही बातमी प्रसिद्ध केली.

पंतप्रधान नेत्यान्याहू यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून कोहेन यांच्याकडे पाहिले जाते. कोहेन यांनीच तीन वर्षांपूर्वी इराणमध्ये प्रवेश करून अणुकार्यक्रमाबाबतची इत्यंभूत माहिती मिळविली होती. पुढे इस्रायली पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर ही माहिती उघड केली. कोहेन यांच्या या ऑपरेशनमुळे इराण हादरला होता.

दरम्यान, कोहेन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची भेट घेऊन इराणबाबत इस्रायलची भूमिका स्पष्टपणे मांडतील, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. त्याचबरोबर आपल्या या अमेरिकेच्या दौर्‍यात मोसादचे प्रमुख अमेरिकी गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’च्या प्रमुखांची भेट घेणार आहेत.

leave a reply