‘तौकते’ चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस

- मुंबईतही सतर्कतेचा इशारा

मुंबई – अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ‘तौकते’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. या चक्रीवादळामुळे १५ ते १७ तारखेदरम्यान महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीला, तसेच गोवा, गुजरात, केरळ, कर्नाटकात जोरदार पावसाचा तडाखा बसणार असल्याचा इशारा हवामानखात्याने दिला आहे. मात्र शुक्रवारपासूनच कोकणात अनेक भागात पावसाला सुरूवात झाली. याआधी समुद्रात गेलेल्या शेकडो बोटी हवामानखात्याच्या इशार्‍याच्या पार्श्‍वभूमीवर किनारपट्टीवर परतल्या. मुंबईच्या महापालिका आयुक्तांनी ‘तौकते’ चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाला सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे. वीज पुरवठा खंडीत होण्याची शक्यता असल्याने रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

‘तौकते’ चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस - मुंबईतही सतर्कतेचा इशाराअरबी समुद्रात आग्नेयकडे चार दिवसांपूर्वी कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. यामुळे वादळाची निर्मिती होऊ शकते, तसेच मोसमी पावसाच्या आगमनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. चक्रीवादळ निर्माण झाल्यास किनारपट्टीकडील भागात वादळीवार्‍यासह पावसाचा इशारा हवामानखात्याने दिला होता. यानुसार काही ठिकाणी रेड अलर्ट काही ठिकाणी ऑरेंज ऍलर्ट देण्यात आला होता. हवामानखात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे लक्षद्विप बेटांजवळ चक्रीवादळाची निर्मिती झाली असून या चक्रीवादळाला ‘तौकते’ हे म्यानमारने दिलेले नाव देण्यात आले आहे.

‘तौकते’ चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस - मुंबईतही सतर्कतेचा इशाराशुक्रवारपासूनच चक्रिवादळाने आपला प्रभाव दाखविण्यास सुरुवात केली. सिंधुदूर्ग किनारपट्टी भागात काही भागात जोरदार पाऊस झाला, तर काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडला. पुढील दोन दिवसात सुमारे ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील व मुसळधार पावसाचा तडाखा कोकण आणि गोवा किनारपट्टीला बसणार आहे. यामुळे यंत्रणांना सतर्क राहण्याचा आणि वेळ पडल्यास किनारपट्टीवरील गावांमधून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी सज्ज राहण्यास जिल्हा प्रशसनाने यंत्रणांना सांगितले आहे.

याआधी शुक्रवार सकाळपासून केरळातही जोरदार पावसाला सुरुवात झाली. येथील चेलन्नम, कन्नामलाई, मनस्सरई, इडव्हनक्कड या जिल्ह्यांमध्ये कित्येक भागांना पावसाने झोडपले. येथील काही जिल्ह्यांमध्ये रेड ऍलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही तासात या चक्रीवादळात बदल होतील आणि १८ मे पर्यंत हे वादळ गुजरात किनारपट्टीवर धडकेल, असा अंदाज हवामानखात्याने व्यक्त केला आहे.

leave a reply