हिजबुल्लाहला जबर किंमत मोजावी लागेल

- इस्रायलच्या अधिकार्‍याने बजावले

किंमत मोजावी लागेलतेल अविव – येत्या काळात हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ल्याचा प्रयत्न केलाच तर त्यांना जबर किंमत मोजावी लागेल, असे इस्रायलने बजावले आहे. हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ल्यासाठी किमान एक लाख दहशतवादी तयार केल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती.

सिरियातील संघर्षाच्या आडून हिजबुल्लाहने आपल्या शस्त्रसज्जतेत वाढ केल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. काही महिन्यांपूर्वी गाझातील हमासबरोबर भडकलेल्या अकरा दिवसांच्या संघर्षात हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर जवळपास चार हजार रॉकेट्स प्रक्षेपित केले होेते. पण येत्या काळात हिजबुल्लाहबरोबर संघर्ष भडकला तर लेबेनॉनमधील ही दहशतवादी संघटना एका दिवसात किमान दोन हजार रॉकेट्सचा मार इस्रायलवर करील, असे इस्रायलच्या संरक्षणदलाने म्हटले होते.

यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांच्या इस्रायली सीमेजवळ संशयास्पद हालचाली वाढल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. तर काही दिवसांपूर्वीच इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी लेबेनॉनमधील हिजबुल्लाह, गाझातील हमास तसेच सिरियातील इराणसंलग्न दहशतवादी संघटना एकाच वेळी इस्रायलवर हल्ला चढवू शकतात, अशी शक्यता वर्तविली होती.

leave a reply