भारत व चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात उच्चस्तरीय सुरक्षा बैठक

नवी दिल्ली/इस्लामाबाद – १९६२ साली चीनने बेसावध असलेल्या भारतावर हल्ला चढवून लडाखचा २८ हजार चौरस किलोमीटर इतका भूभाग ताब्यात घेतला होता. भारत या युद्धात गुंतलेला असताना संपूर्ण काश्मीर ताब्यात घेण्याची नामी संधी पाकिस्तानसमोर चालून आली होतीच पण, पाकीस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांनी ही संधी साधली नाही. आताही भारत- चीन सीमेवर प्रचंड प्रमाणात तणाव माजलेला असताना पाकिस्तानने हल्ला चढवून भारताच्या ताब्यातून काश्मीर हिसकावून घ्यावे पुन्हा अशी संधी मिळणार नाही असे दावे पाकिस्तानातील भारत द्वेष्टे अतिरेकी करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या तीनही दलांच्या प्रमुखांची ‘आयएसआय’च्या मुख्यालयात झालेली बैठक अतिशय महत्त्वाची ठरते.High-level security meeting in Pakistan

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा, नौदलप्रमुख  ॲडमिरल जाफर मेहमूद अब्बासी आणि वायुसेनाप्रमुख मुजाहिद अनवार खान ‘आयएसआय’च्या मुख्यालयात पार पडलेल्या या बैठकीला उपस्थित होते. तसेच पाकिस्तानच्या ‘चेअरमन जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी’चे (सीजेएससी) अध्यक्ष जनरल नदीम रझाही या बैठकीसाठी  ‘आयएसआय’च्या मुख्यालयात पोहोचले होते.  ‘आयएसआय’च्या मुख्यालयात पाकिस्तानच्या ‘ सीजेएससी’ आणि तीनही संरक्षणदलांच्या प्रमुखांची एकत्र उपस्थिती सामान्य घटना नसल्याचे पाकिस्तानातील पत्रकारच सांगत आहेत. 

पाकिस्तान संकटकाळातच अशा स्वरूपाच्या बैठका आयोजित करतो. याआधी २०१८ साली पाकिस्तानमध्ये आयएसआयची बैठक बोलावली होती. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी अशी बैठक झाली आहे. पाकिस्तानच्या लष्कराच्या ‘इंटर सर्व्हिस पब्लिक रेषेवरील रिलेशन’चे (आयएसपीआर) महासंचालक मेजर जनरल बब्बर इफ्तिकार यांनी भारत जम्मू काश्मीरमध्ये करीत असलेल्या अत्याचाऱ्याच्या मुद्दयांवर चर्चा झाल्याचे म्हटले आहे. तसेच नियंत्रण रेषेवर भारत करीत असलेल्या गोळीबाराची गंभीर दखल घेण्यात आल्याचा दावा इफ्तिकार यांनी केला.  याशिवाय क्षेत्रीय सुरक्षेसंदर्भांतील इतर मुद्द्यावर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. याद्वारे भारतावर चीनवरील तणाव वाढलेला असताना भारतावर दडपण टाकण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू असल्याचे दिसत आहे. याच दरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद शाहमहमूद कुरेशी यांनी चीन बरोबरील तणावाला भारतच जवाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे.

पाकीस्तानातील भारत विश्लेषक माजी लष्करी अधिकारी भारताचा चीन बरोबरील संघर्ष सुरू झाला असल्याचा आनंद व्यक्त करीत आहेत. या संघर्षात भारताला यश मिळू शकणार नाही असे सांगून पाकिस्तानने या स्थितीचा फायदा उचलायला हवा, असे या मंडळींचे म्हणणे आहे. तसेच भारत- चीन संघर्षात पाकिस्तान ही ओढला जाईल अशी चिंता या देशाच्या काही समंजस विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी लडाखमधील संघर्षात भारताला गुंतवून चीनने पीओके भारताच्या ताब्यात जाण्यापासून वाचविले असा निष्कर्ष पाकिस्तानचे काही पत्रकार नोंदवित आहेत.

leave a reply