दांभिक डावी विचारसरणी पाश्‍चात्य मूल्ये व समाजासाठी धोकादायक

- ब्रिटनच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखांचा इशारा

लंडन – पाश्‍चात्य देशांमध्ये दांभिक डाव्या विचारसरणीच्या गटांकडून क्लेशदायक व बेगडी भावनाट्य सुरू असून ही बाब पाश्‍चात्य मूल्ये आणि समाजासाठी धोकादायक असल्याचा इशारा ब्रिटीश नेते ऑलिव्हर डाऊडन यांनी दिला. ही दांभिक डावी विचारसरणी समाजाच्या अवनीतीचे लक्षण असून बाह्य शक्तींविरोधात संघर्ष करण्याऐवजी पाश्‍चात्य समाज स्वकियांवरच टीका व हल्ले करीत आहे, अशा शब्दात डाऊडन यांनी ‘कॅन्सल कल्चर’ला लक्ष्य केले. डाऊडन हे ब्रिटनच्या सत्ताधारी ‘कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी’चे सहअध्यक्ष असून गेल्या काही वर्षांपासून डाव्या विचारसरणीविरोधात आक्रमक भूमिका मांडत आहेत.

दांभिक डावी विचारसरणी पाश्‍चात्य मूल्ये व समाजासाठी धोकादायक - ब्रिटनच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखांचा इशाराअमेरिकी अभ्यासगट ‘हेरिटेज फाऊंडेशन’ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात डाऊडन यांनी दांभिक डाव्या विचारसरणीवर घणाघाती हल्ला चढविला. ‘गेल्या काही वर्षात दांभिक डावी विचारसरणी सर्वच ठिकाणी फैलावत असल्याचे दिसत आहे. शाळा, महाविद्यालये, सरकारी यंत्रणा व मोठ्या कंपन्यांमध्येही याचा शिरकाव झाला आहे. ही दांभिक डावी विचारसरणी समाजाच्या अवनीतीचे लक्षण आहे. आपले लक्ष आता बाह्य शक्तींशी संघर्ष करण्यावर असायला हवे. मात्र अशा काळात आपण आत्मटीकेवर भर देत स्वकियांवरच हल्ले चढवित आहोत’, असा शब्दात डाऊडन यांनी दांभिक डाव्या विचारसरणीवर कोरडे ओढले.

दांभिक डावी विचारसरणी पाश्‍चात्य मूल्ये व समाजासाठी धोकादायक - ब्रिटनच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखांचा इशारा‘अमेरिका व ब्रिटन हे दोन भिन्न समाज आहेत. पण आपली पारंपारिक मूल्ये समान आहेत. या पार्श्‍वभूमीवर आपण दांभिक डाव्या विचारसरणीच्या गटांकडून करण्यात येणार्‍या क्लेशदायक व बेगडी भावनाट्याच्या नादाला लागता कामा नये. ही विचारसरणी पाश्‍चात्य मूल्यांसाठी धोका असून आपल्या समाजाच्या आत्मविश्‍वासाला कमकुवत करण्याचे काम करीत आहेत’, असा आरोप ‘कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी’च्या सहअध्यक्षांनी केला. गणिताचा संबंध वसाहतवादाशी जोडणे किंवा सर्वनामांवरून आक्रमक भूमिका घेणे यासारख्या गोष्टींकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असेही डाऊडन यांनी यावेळी बजावले.

दांभिक डावी विचारसरणी पाश्‍चात्य मूल्ये व समाजासाठी धोकादायक - ब्रिटनच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखांचा इशाराअमेरिकेतील दांभिक डावी विचारसरणी व आंदोलनांच्या ब्रिटनमधील प्रभावाचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आला आहे. अमेरिकेत झालेल्या ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’च्या निदर्शनांना समर्थन देण्यासाठी ब्रिटनमध्येही मोर्चे काढण्यात आले होते. बाब मोर्च्यांपुरती मर्यादित न राहता ब्रिटनमधील गटांनी देशातील विद्यापीठांना तसेच इतिहासातील व्यक्तिमत्त्वांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारने आक्रमक भूमिका घेतली असून डावी दांभिक विचारसरणी व बहिष्काराची संस्कृती खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. डाऊडन यांचे वक्तव्य त्याचाच भाग आहे.

leave a reply