ब्रिटनमध्ये सायबर गुन्हेगारी वाढली

अठरा लाख पाऊंडचे नुकसान झाल्याचा दावा

लंडन – अमेरिका, इटली प्रमाणे ब्रिटनमध्येही कोरोनाव्हायरसच्या साथीने थैमान घातले असून दहा हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. ब्रिटनमध्ये सध्या लॉकडाऊन सुरू आहे. याचा ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसत आहे. यात आता सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून त्यामुळे ब्रिटनला अंदाजे १८ लाख पाऊंडचे नुकसान होत असल्याची माहिती समोर आली आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे गृहमंत्री प्रिती पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन गुन्हेगारीविषयक माहिती दिली. यामध्ये त्यांनी देशातल्या गुन्हेगारीत २१ टक्के घट झाल्याचे नमूद करताना ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार भयंकररित्या वाढल्याचे म्हटले आहे. या ऑनलाईन फसवणूकीमुळे अंदाजे १८ लाख पाऊंडचे नुकसान झाल्याचे पटेल यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सायबर हल्ल्यांमुळे गेल्या गेल्या १२ महिन्यात ब्रिटनमधील उद्योगक्षेत्राला जबर फटका बसल्याची माहिती आठवड्यांपूर्वी समोर आली होती. या सायबर हल्ल्यांमुळे ब्रिटनमधील मध्यम उद्योग ६८ टक्के तर मोठे उद्योगक्षेत्र ७५ टक्के प्रभावित झाले होते.

leave a reply