अमेरिका, फ्रान्स, जर्मनी बरोबर भारताचा ‘एअर बबल’ करार

- नागरी उड्डयनमंत्री हरदीपसिंग पुरी

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवा बंद होती. मात्र भारताने अमेरिका, फ्रान्स, जर्मनीबरॊबर ‘एअर बबल’ करार केला केला असून लॉकडाऊननंतर प्रथमच भारत-अमेरिका विमानसेवा सुरु झाली आहे. १८ जुलैपासून फ्रान्सबरोबर हवाई सेवा सुरू होणार आहे. ब्रिटनबरोबर अशाच ‘एअर बबल’ करारासाठी चर्चा सुरु असल्याचे नागरी उड्डयनमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटले आहे.

AIR-BUBBLE-Agreementकोरोनाच्या संकटामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या क्षेत्राला आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे लवकरात लवकर विमान सेवा सुरु कारण्याची मागणी करण्यात येत होती अखेर अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनीबरोबर करार करून या देशांमध्ये विमान सेवा सुरु करण्याच निर्णय घेण्यात आला.

अमेरिका आणि भारत यांच्यात १७ ते ३१ जुलै दरम्यान १८ विमानांची उड्डाणे निश्चित झाली आहेत. ही उड्डाणे दिल्ली ते न्यूयॉर्क आणि दिल्ली ते सॅनफ्रॅन्सिस्को दरम्यान होतील. यासह एअर फ्रान्स दिल्ली, मुंबई, बंगळुरू पॅरिस दरम्यान १८ ते १ ऑगस्ट या कालावधीत २८ विमानाचे उड्डाण करेल.

‘एअर बबल’ करारानुसार ठरलेल्या कालावधीतच निश्चित विमानसेवा पूर्ण करायच्या असतात. त्यामुळे या कालावधीत या फेऱ्या होणार आहेत. जर्मनीबरोबर देखील करार करण्यात आला आहे जर्मनीची लुफ्तान्सा कंपनी विमान सेवा हाताळणार आहे. ब्रिटनबरोबर हवाईसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे हरदीपसिंग पुरी म्हणाले.

leave a reply