चीनमधून भारतात होणारी आयात घटली

नवी दिल्ली/ बीजिंग – चीनमधून भारतात होणारी आयात २४.७ टक्क्यांनी घटली आहे. चिनी मालावर बहिष्काराचा मोठा परिणाम दिसून येत असून दोन्ही देशांच्या द्विपक्षिय व्यापारात झालेली घट चीनसाठी तगडा झटका ठरतो.

भारतात होणारी आयात

चीनचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’मधील एका लेखात पुन्हा एकदा भारतात होणाऱ्या चिनी उत्पादनांवरील बहिष्काराच्या आवाहनांचा खिल्ली उडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आवाहनांचा नेहमीप्रमाणे काहीही परिणाम झाला नसल्याचे ग्लोबल टाईम्सचे म्हणणे आहे. जुलै महिन्यात चीन भारतात करीत असलेल्या निर्यातीत थोडीशी वाढ होऊन ही निर्यात ५.६ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. जून महिन्यात ही निर्यात ४.७९ अब्ज डॉलर्स इतकी होती, असा ग्लोबल टाईम्सचा दावा आहे.

मात्र प्रत्यक्षातील चीन सरकारच्या मुखपत्रात आलेली माहिती भारतीय डाटामध्ये तफावत आहे. चीनमधून भारतात झालेली आयात ग्लोबल टाईम्सने दिलेल्या आकडेवारीपेक्षा कमी असल्याचे वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने समोर येत आहे. थोडक्यात चीन पुन्हा एकदा भ्रम पसरवत आहे.

जूनमध्ये भारतात चीनमधून ३.३२ अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात झाल्या. गेल्यावर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत ही आयात तब्बल ४३.७३ टक्क्यांनी कमी आहे. तसेच गेल्यावर्षी जुलै महिन्यात चीनमधून भारतात ६.१८ अब्ज डॉलर्सची आयात करण्यात आली होती. तर यावर्षीच्या जुलै महिन्यातील आकडेवारी अजून जाहीर करण्यात आलेली नाही.

जानेवारीपासून चीन सरकारच्या कस्टम विभागाचा डाटा पहिला तरी दोन्ही देशातील व्यापार घटल्याचे स्पष्ट होते. जानेवारी ते जुलै पर्यंत चीनकडून भारतात करण्यात आलेली निर्यात २४.७ टक्क्यांनी घटून ३२.२८ अब्जावर आली आहे. भारताने चीनमधून आयात कमी करण्यासाठी डम्पिंग ड्युटीमध्ये वाढ केली आहे. निविदा नियम बदलले आहेत व जवळपास २०० वस्तूंच्या आयातीवर बंदी आणली आहे. त्यामुळे येत्या काळात चीनमधून आयात आणखी घटेल, असे दावे करण्यात येत आहे.

leave a reply