भारताने भूतानमध्ये उभारलेल्या जलविद्युत प्रकल्पाला प्रतिष्ठित ‘ब्रुनेल’ पुरस्कार

नवी दिल्ली – भारताने भूतानमध्ये उभारलेल्या ‘मांगडेचू जलविद्युत’ प्रकल्पाला ब्रिटन ‘इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स’ने प्रतिष्ठित ‘ब्रुनेल’ पुरस्कार सन्मानित केले आहे. गेल्या वर्षी १७ ऑगस्टला भूतान दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते.

'ब्रुनेल'

भूतानच्या ट्रोंगसा जिल्ह्यातील मांगडेचू दीवर साडेचार हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाकडे दोन्ही देशांमधील मैत्रीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. या प्रकल्पाला ७० टक्के कर्ज आणि ३० टक्के अनुदानाद्वारे भारताने वित्तसहाय्य केले आहे. ब्रिटनच्या इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअर्सच्या पुरस्कार समितीनेतर्फे ‘ ‘मांगडेचू जलविद्युतनिर्मिती’ प्रकल्पाला पुरस्कार प्रदान करण्याची घोषणा करण्यात आली.

या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पायभूत सुविधा विकसित झाल्या असून पिण्याचे पाणी आणि सिंचनाची समस्याही दूर झाली आहे, अशा शब्दात ब्रिटिश अभियंत्यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी आणि लोटे शेरिंग यांनी संयुक्तपणे उद्घाटन केलेल्या या प्रकल्पाला ‘ब्रुनेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया भूतानमधील भारतीय राजदूत रुचिरा कंबोज यांनी दिली.

दोन्ही देशांनी एकात्रीतरित्या एखादे लक्ष्य गाठण्यासाठी एकत्र काम केल्याचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे कंबोज यांनी म्हटले आहे. हा प्रकल्प दोन्ही देशांसाठी महत्त्वपूर्ण टप्पा” आहे . “एकत्रितपणे काम करणारे दोन देश नागरिकांच्या जीवनात अफाट सकारात्मकता कशी आणू शकतात हे या प्रकल्पातून स्पष्ट होते असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते, याची आठवण कंबोज यांनी करून दिली.

२०१२ साली बांधकामास सुरुवात करण्यात आलेल्या हा प्रकल्प सात वर्षात उभा राहिला. या प्रकल्पातुन १२०० कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र एका वर्षात जलविद्युतनिर्मिती’ प्रकल्पाच्या माध्यमातून १३०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. २ ऑगस्टपासून या प्रकल्पाची सर्व चार युनिट पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. या प्रकल्पातून दिवसाला ७७९ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येते.

leave a reply