‘डीप टेक’च्या आघाडीवर भारताने अमेरिकेशी सहकार्य करावे

- अमेरिकेच्या विश्लेषकांचे आवाहन

वॉशिंग्टन – ‘पाच ते सहा वर्ष आधी भारताची आर्थिक कामगिरी समाधानकारक नव्हती. भारतापेक्षा जगभरात इतर काही ठिकाणी व्यापारउद्योग करणे खूपच सोपे असल्याचे दिसत होते. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली असून भारत जगभरातील गुंतवणूकदारांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. भारत अशारितीने आपल्याकडे गुंतवणूक आकर्षित करीत राहिला, तर भारताचा काळ सुरू झाला आहे असे म्हणता येईल’, असा दावा जागतिक बँकेचे प्रमुख सल्लागार इंदरमित गिल यांनी केला. याला अमेरिकेतील इतर विश्लेषक दुजोरा देत असून भारताची ‘डीप टेक’मधील क्षमता लक्षात घेता अमेरिका धोरणात्मक पातळीवरील भारताबरोबरील सहकार्य व्यापक करीत असल्याचे या विश्लेषकांनी म्हटले आहे.

‘डीप टेक’च्या आघाडीवर भारताने अमेरिकेशी सहकार्य करावे - अमेरिकेच्या विश्लेषकांचे आवाहनबीग डाटा, नॅनो टेक्नॉलॉजी, ब्लॉकचेन, क्वांटम कॉम्प्युटिंग, रोबोटिक्स, ॲडव्हान्स मटेरियल सायन्स, फोटोनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स, बायटोकेट, व्हिजन अँड स्पीच अल्गोरिद्म, आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंग या साऱ्याचा डीप टेक मध्ये समावेश केला जातो. हे तंत्रज्ञान पुढच्या काळात अतिशय महत्त्वाचे ठरणार असून डीप टेक हे भविष्य असल्याचे दावे केले जातात. या आघाडीवर भारत टाकत असलेल्या पावलांची जगाने दखल घेतली असून महासत्ता अमेरिका देखील या आघाडीवर भारताशी सहकार्य करण्यासाठी उत्सुकता दाखवित आहे.

‘युएस अँड फॉरिन कमर्शिअल सर्व्हिस-युएसएफसीएस’चे माजी असिस्टंट सेक्रेटरी अरुण कुमार यांनीही भारताच्या क्षमता आपण फार आधीपाहून पाहिलेली आहे, असा दावा केला. माफक दरात सॉफ्टवेअर्स उपलब्ध करून देणाऱ्या देशापासून ते उत्पादनाचे केंद्र बनण्याच्या तयारीत असलेल्या भारतामध्ये अफाट क्षमता असल्याचे अरुण कुमार म्हणाले. तसेच भारत अमेरिकेचा अत्यंत महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार देश बनत असल्याचे अरुण कुमार यांनी स्पष्ट केले. नुकतीच भारत व अमेरिकेमध्ये ‘क्रिटकल अँड इर्मजिंग टेक्नॉलॉजी-आयसीईटी’ची बैठक पार पडली. दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यात सहभागी झाले होते. ‘डीप टेक’च्या आघाडीवर भारताने अमेरिकेशी सहकार्य करावे - अमेरिकेच्या विश्लेषकांचे आवाहनयात आर्टिफिशल इंटेलिजन्स, अतिप्रगत क्षमतेचे कॉम्प्युटर्स, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्र तसेच पुढच्या पिढीतील दूरसंचार सेवा तसेच सेमीकंडक्टर्सच्या क्षेत्रातील सहकार्यावर ‘आयसीईटी’चे सहकार्य महत्त्वाचे ठरेल, असा दावा अरुण कुमार यांनी केला.

अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे माजी प्राध्यपक आरोग्यस्वामी पॉलराज यांनी भारतातील ‘डीप टेक’ अर्थात अतिप्रगत तंत्रज्ञान व संशोधनावर आधारलेले नवे उद्योग सेमीकंडक्टर, ऊर्जा, कार्बनउत्सर्जनविरहित-ग्रीन हायड्रोजन व इलेक्ट्रिक वाहनांवर आधारलेले आहे. सध्या अमेरिकेच्या जीडीपीमध्ये या ‘डीप टेक’ क्षेत्राचा वाटा २.५ टक्के इतका असून हे प्रमाण ५५० अब्ज डॉलर्सवर जाते. त्यामुळे भारताच्या डीप टेक क्षेत्रासाठी अमेरिका फार मोठे सहकार्य करून या क्षेत्रात मोठी गुंतवणूक देखील करू शकेल, असा दावा पॉलराज यांनी केला.

डीप टेक हे ग्लोबल तंत्रज्ञान असून याची पुरवठा साखळी जगभरात विखुरलेली आहे. म्हणूनच अशा देशांच्या गटात सहभागी होण्याचा सूज्ञ निर्णय भारताने घ्यावा, असे पॉलराज यांनी सुचविले आहे. ‘डीप टेक’च्या आघाडीवर भारताने अमेरिकेशी सहकार्य करावे - अमेरिकेच्या विश्लेषकांचे आवाहनपुढच्या दशकात या डीप टेकचा जागतिक अर्थव्यवस्थेतील वाटा पाच टक्के इतका मोठा असेल, याकडेही पॉलराज यांनी लक्ष वेधले आहे.

दरम्यान, भारताने सेमीकंडर्क्सच्या निर्मितीसाठी सेमीकंडक्टर मिशन हाती घेतले आहे. या आघाडीवर चीनसारख्या बलाढ्य देशालाही फारसे यश मिळालेले नाही. पण आत्ताचा भारत सेमीकंडक्टरच्या निर्मितीच्या आघाडीवर यशस्वी ठरेल, कारण या क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील कुशल मनुष्यबळामध्ये २० टक्के भारतीय आहेत, असे भारताचे माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले होते. त्याचवेळी येत्या काही वर्षात भारतातील सेमीकंडक्टरची मागणी १०० अब्ज डॉलर्सवर जाणार असून या क्षेत्रात आत्मनिर्भर होणे हे देशाच्या हितसंबंधांसाठी आवश्यक बनले आहे. अशा परिस्थितीत भारताने हाती घेतलेल्या या मोहिमेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेसह इतर विकसित देश देखील उत्सुकता दाखवित आहेत. अमेरिकन विश्लेषकांनी यासंदर्भात केलेली विधाने त्याची साक्ष देत आहेत.

हिंदी English

 

leave a reply