भारतीय नौदलाच्या ‘सबमरीन रेक्स्यू सिम्युलेटर’ खरेदीसाठी हालचाली

नवी दिल्ली – खोल समुद्रात बचावकार्य राबविण्यासाठी तीन वर्षांपूर्वी भारतीय नौदलात ‘डीप सबमर्जन्स रेक्स्यू व्हेईकल’चा (डीएसआरव्ही) समावेश करण्यात आला होता. यामुळे भारत ‘डीएसआरव्ही’ असलेल्या जगातील मोजक्या देशांमध्ये सहभागी झाला होता. आता नौदल ‘सबमरीन रेक्स्यू सिम्युलेटर’ खरेदी करणार आहे. यासाठी रिक्वेस्ट फॉर इन्फर्मेशन (आरएफआय) जारी करण्यात आल्याचे वृत्त आहे.

भारतीय नौदलाच्या ‘सबमरीन रेक्स्यू सिम्युलेटर’ खरेदीसाठी हालचालीभारतीय नौदल दोन ‘सबमरीन रेक्स्यू सिम्युलेटर’ खरेदी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यातील ‘सबमर्जन्स रेक्स्यू वेसल’ (एसआरव्ही) आणि रिमोटली ऑपरेटेड व्हेईकलचे (आरओव्ही) चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘सबमरीन रेक्स्यू सिम्युलेटर’ची नौदलाला आवश्यकता आहे. ‘डीएसआरव्ही’ हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यासाठीही हे ‘सबमरीन रेक्स्यू सिम्युलेटर’ महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे संरक्षणमंत्रालयाने नौदलाच्या मागणीनंतर त्याच्या खरेदीची प्रक्रिया सुरू केली असून आरपीएफ जारी करण्यात आले आहे.

सागरी क्षेत्रातील सुरक्षाविषयक आव्हाने पाहता नौदलाला आधुनिक केले जात आहे. तसेच सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी युद्धनौका व पाणबुड्यांचा ताफा वाढविला जात आहे. त्याचवेळी युद्धकाळात व इतर आपत्कालिन परिस्थितीत खोल समुद्रात बचावकार्य राबविण्यासाठी आधुनिक यंत्रणांची आवश्यकता भासत आहे.‘डीप सबमर्जन्स रेक्स्यू व्हेईकल’ अर्थात ‘डीएसआरव्ही’ची खरेदी याचा महत्त्वाचा भाग होता.

‘डीएसआरव्ही’ ही एकप्रकारची बचावकार्यासाठी वापरात येणारी या पाणबुडी असून तीचे वजन ३३ टन आहे. डीएसआरव्ही समुद्र खोलीत ६५० मीटरपर्यंत जाऊ शकेल. त्यामुळे दुर्घटनेवेळी बचाव कार्यास मोठ्या प्रमाणात मदत मिळते. तसेच ‘डीएसआरव्ही’ जहाजावरून आणि हवाई मार्गाने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेता येते.

मात्र ‘डीएसआरव्ही’सारखी किचकट यंत्रणा हातळण्यासाठी नौदलांच्या जवानांना प्रशिक्षीत करणे आवश्यक ठरते. यासाठी ‘सबमरीन रेक्स्यू सिम्युलेटर’ हे अत्यंत महत्वाचे आहे. ‘सबमरीन रेक्स्यू सिम्युलेटर’ ही सुद्धा खोल समुद्रात बचावकार्यासाठी राबविण्यात येणारी यंत्रणा असून तिचे स्वरुप छोटे असते. ‘डीएसआरव्ही’, तसेच ‘सबमर्जन्स रेक्स्यू व्हेसल’ (एसआरव्ही) आणि रिमोटली ऑपरेटेड व्हेईकलचे (आरओव्ही) हाताळण्याचे, तसेच त्याद्वारे बचावकार्य राबविण्याचे प्रशिक्षण देणे ‘सबमरीन रेक्स्यू सिम्युलेटर’मुळे अधिक सुलभ होईल.

leave a reply