सिरिया, इराक आणि अफगाणिस्तानातील अस्थैर्यामुळे ‘आयएस 2.0` उदयास येईल

रशियाच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

मॉस्को – सिरिया, इराक आणि अफगाणिस्तान या अस्थिर देशांमध्ये दहशतवादापासून असलेला धोका अजूनही कायम आहे. ही अतिशय चिंताजनक बाब असून अशीच परिस्थिती कायम राहिली तर ‘आयएस 2.0`चा उदय होईल. यापासून रशियाच्या सुरक्षेला मोठा धोका संभवतो, असा इशारा रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री ओलेग सिरोमोलोतोव्ह यांनी दिला. ‘आयएस`चे दहशतवादी आफ्रिकी देशांमध्ये अधिक घातपात माजवतील, याकडे ओलेग यांनी लक्ष वेधले.

इराक आणि अफगाणिस्तानारशियन वृत्तसंस्थेशी बोलताना उपपरराष्ट्रमंत्री ओलेग यांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता अधिकच चिंताजनक बनल्याचे सांगितले. यासाठी ओलेग यांनी सिरिया व इराकमधील दहशतवादाचा उल्लेख केला. यापैकी सिरियाच्या इदलिब प्रांतात अजूनही आयएस आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांचे तळ सक्रीय आहेत, हे रशियन उपपरराष्ट्रमंत्र्यांनी लक्षात आणून दिले. इदलिबच्या अस्थैर्यामागे या दहशतवादी संघटनांच्या कारवाया हेच मुख्य कारण असल्याचा आरोप ओलेग यांनी केला.

इराक आणि अफगाणिस्तानाअफगाणिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या हालचालींवर रशियाची बारीक नजर असल्याचे उपपराष्ट्रमंत्री ओलेग यांनी स्पष्ट केले. तालिबानने काबुलचा ताबा घेतल्यापासून अल कयदा आणि आयएस या दहशतवादी संघटनांनी अफगाणिस्तानातील आपला प्रभाव वाढविल्याची चिंता उपपरराष्ट्रमंत्री ओलेग यांनी व्यक्त केली. या दहशतवादी संघटनांपासून मध्य आशियाई देश आणि रशियाच्या सुरक्षेला थेट धोका असल्याचा दावा ओलेग यांनी केला. अफगाणिस्तानातील दहशतवादापासून असलेल्या धोक्याबाबत दोन दिवसांपूर्वीच रशिया आणि शेजारी मध्य आशियाई देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली.

दरम्यान, अफगाणिस्तानातील दहशतवादाचा सामना करण्यासाठी रशियाने मध्य आशियाई देशांना शस्त्रास्त्रे पुरविण्यास सुरुवात केली आहे.

leave a reply