तैवानवरील आक्रमण प्रदीर्घ युद्धास कारणीभूत ठरेल

- अमेरिकी अभ्यासगटाच्या विश्‍लेषकांचा दावा

वॉशिंग्टन/तैपई – चीनने तैवानवर केलेल्या आक्रमणातून लगेच निकाल लागण्याची शक्यता नसून उलट हे युद्ध प्रदीर्घ काळापर्यंत चालण्याची शक्यता असल्याचा दावा अमेरिकी अभ्यागटाच्या विश्‍लेषकांनी केला आहे. अमेरिकेतील ‘ब्रुकिंग्ज् इन्स्टिट्यूट’मधील अभ्यासक मायकल ओहॅन्लॉन यांनी, चीनने तैवानवर दावा सांगितल्यावर तैवानचा मुद्दा सुटेल, अशी शक्यता नसल्याचे म्हटले आहे. उलट त्यातून प्रदीर्घ काळासाठी सुरू राहणार्‍या संघर्षाला सुरुवात होईल, असे ओहॅन्लॉन यांनी बजावले.

तैवानवरील आक्रमण प्रदीर्घ युद्धास कारणीभूत ठरेल - अमेरिकी अभ्यासगटाच्या विश्‍लेषकांचा दावागेल्या वर्षभरात चीन तैवानविरोधात अधिक आक्रमक झाला असून ‘ग्रे झोन वॉरफेअर’ व युद्धसरावांची तीव्रता वाढली आहे. चीनचे नेतृत्त्व तसेच लष्करी अधिकार्‍यांकडून तैवानला सातत्याने धमकावण्यातही येत आहे. या पार्श्‍वभूमीवर, जगभरातील अनेक विश्‍लेषक चीन व तैवानमधील युद्धाबाबत विविध शक्यता वर्तवित आहेत. बहुतांश विश्‍लेषकांनी चीनचा हल्ला व तैवानचा प्रतिकार यावर भर दिला आहे. मात्र ओहॅन्लॉन यांनी, युद्धाचे स्वरुप व कालावधी याकडे लक्ष वेधले आहे.

चीनने तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका व सहकारी देश त्यात उतरतील, पण त्यात कोणीही निर्णायक विजय मिळवू शकणार नाही, असा दावा ‘ब्रुकिंग्ज् इन्स्टिट्यूट’मधील अभ्यासकांनी केला आहे. ओहॅन्लॉन यांनी चीन, तैवान व अमेरिकेमधील युद्धाबाबत मत मांडताना त्याची तुलना गेल्या शतकातील युद्धांशी केली आहे.

leave a reply