अमेरिकेला उत्तर देण्यासाठी इराणने ग्रीसचे इंधन टँकर्स ताब्यात घेतले

ग्रीसचे इंधन टँकर्सतेहरान – गेल्या महिन्यात ग्रीसच्या नौदलाने इराणची इंधनवाहू जहाजे जप्त करून त्यातील इंधनाचे बॅरल्स अमेरिकेच्या हवाली केले होते. यामुळे खवळलेल्या इराणने अमेरिकेवर चाचेगिरीचा आरोप केला होता. आता इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी पर्शियन आखातातून प्रवास करणाऱ्या ग्रीसच्या दोन इंधन टँकर्सचा ताबा घेऊन ग्रीससह अमेरिकेला प्रत्युत्तर दिले आहे. याने पर्शियन आखातातील वातावरण तंग बनले आहे.

एप्रिल महिन्यात ग्रीसच्या सागरी क्षेत्राजवळून प्रवास करणाऱ्या इराणच्या इंधनवाहू जहाजांना खराब हवामानाचा सामना करावा लागला. रशियन ध्वजाखाली प्रवास करणाऱ्या इराणच्या जहाजांनी हवामानात सुधारणा येईस्तोवर ग्रीसकडे किनारपट्टीवर अँकर टाकण्याची परवानगी मागितली होती. तरीही ग्रीसच्या नौदलाने इराणच्या जहाजांचा ताबा घेतला.

ग्रीसचे इंधन टँकर्सयानंतर ग्रीसने सदर जहाजांवरील इंधनाची अमेरिकेला तस्करी केल्याचा आरोप इराणने केला. अमेरिका चाचेगिरी करीत असल्याचा ठपका इराणने ठेवला होता. याला महिना उलटत नाही तोच, पर्शियन आखातातून प्रवास करणाऱ्या ग्रीसचे इंधनवाहू जहाज इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या नौकांनी ताब्यात घेतले.

या घटनेमुळे पर्शियन आखातात तणाव निर्माण झाला आहे. या जहाजांच्या सुटकेसाठी अमेरिका व ग्रीसकडून इराणविरोधात कारवाई होऊ शकते. याने संघर्ष भडकण्याचा धोका निर्माण झाला असून यामुळे सदर क्षेत्र तणावाखाली असल्याचे दिसत आहे.

leave a reply