इराक इंधनाच्या मोबदल्यात फ्रान्सकडून रफायल घेणार

- आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकाचा दावा

रफायलबैरुत – इराक आपल्या संरक्षणसज्जतेवर लक्ष केंद्रीत करीत असून येत्या काळात फ्रान्स व रशियाबरोबर संरक्षण करार करणार आहे. यामध्ये फ्रान्सच्या रफायल विमानांचा तर रशियाच्या टी-९० रणगाड्यांचा समावेश असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक करीत आहेत. रफायल विमानांसाठी इराक फ्रान्सला इंधनाचा पुरवठा करणार असल्याचे या विश्‍लेषकांनी म्हटले आहे.

रफायलयाआधी इराकच्या अंतर्गत सुरक्षामंत्र्यांसाठी सल्लागार राहिलेले आणि सध्या आंतरराष्ट्रीय अभ्यासगटात विश्‍लेषक असलेल्या नॉर्मन रिकलेफ्स यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. याआधी इराकचे लष्कर पाकिस्तानकडून चिनी बनावटीचे ‘जेएफ१७’ विमाने खरेदी करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण रिकलेफ्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराकचे हवाईदल फ्रान्सच्या रफायल विमानांमध्ये उत्सूक आहे.

इराकचे हवाईदल फ्रान्सकडून २४ कोटी डॉलर्सच्या किंमतीची १४ रफायल विमाने खरेदी करणार आहे. त्याचबरोबर ड्रोन्स आणि तोफ देखील खरेदी करणार आहे. तर रशियाकडून टी-९० हे जगप्रसिद्ध रणगाडे मिळविणार आहे. यासाठी इराकी अधिकार्‍यांच्या फ्रान्स व रशियाबरोबर अंतिम टप्प्यातील बोलणी सुरू असल्याचे रिकलेफ्स यांनी सांगितले.

leave a reply