इस्रायल-ऑस्ट्रिया संबंध दीर्घकाल टिकण्यासाठी आहेत

- ऑस्ट्रियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचा विश्‍वास

इस्रायल-ऑस्ट्रियाजेरूसलेम – ‘इस्रायल आणि ऑस्ट्रियातील संबंध हे आधीपेक्षाही मजबूत बनले आहेत. दोन्ही देशांमधील सहकार्य कायम टिकून राहिल’, असा विश्‍वास ऑस्ट्रियाचे परराष्ट्रमंत्री अलेक्झांडर शॉलन्बर्ग यांनी व्यक्त केला.

ऑस्ट्रियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी इस्रायलचा दौरा करून परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांची भेट घेतली होती. इस्रायल व ऑस्ट्रियातील संबंध तसेच इराणबरोबरचा संभाव्य अणुकरार, रशिया-युक्रेन युद्ध आणि कोरोनाचे संकट अशा वेगवेगळ्या मुद्यांवर शॉलन्बर्ग यांनी लॅपिड यांच्याशी चर्चा केली. इस्रायली वृत्तवाहिनीशी बोलताना ऑस्ट्रियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या सहकार्याबाबतच्या आपल्या देशाच्या अपेक्षा व्यक्त केल्या.

इस्रायल आणि ऑस्ट्रियामध्ये धोरणात्मक सहकार्य आहे. पण सदर सहकार्य इथपर्यंत मर्यादित न राहता, ते दीर्घकाल कसे टिकतील, यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच रशियाचा सहकारी देश म्हणून इस्रायलने युक्रेनमधील युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन यावेळी शॉलन्बर्ग यांनी केले.

leave a reply