इस्रायलने हमासची भुयारे उडवून दिली

जेरूसलेम – इस्रायलच्या लष्कराने गुरुवारी रात्री गाझातील हमासचे दहा भुयारीमार्ग उद्ध्वस्त केले. इस्रायलच्या या कारवाईमुळे हमासला जबर हादरा बसल्याचा दावा केला जातो.

इस्रायलने हमासची भुयारे उडवून दिलीहमास व इस्लामिक जिहादवरील कारवाई तीव्र करण्यासाठी आपले लष्कर, रणगाड्यांसह गाझापट्टीत घुसल्याचे इस्रायली लष्कराने गुरुवारी आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर जाहीर केले होते. यामुळे सावध झालेल्या हमासच्या दहशतवाद्यांनी गाझातील भुयारीमार्गांमध्ये आश्रय घेतला. याचीच प्रतिक्षा करीत असलेल्या इस्रायलने हवाई हल्ले चढवून सुमारे १० भुयारीमार्ग उद्ध्वस्त केले.

इस्रायलचे लष्कर गाझामध्ये शिरल्यानंतर त्यांच्यावर घणाघाती हल्ले चढविण्याची तयारी हमासने केली होती. पण डावपेचांच्या बाबतीत आपल्या शत्रूपेक्षा नेहमीच एक पाऊल पुढे ठेवणार्‍या इस्रायली लष्कराने हमासला धक्का दिला.

गाझातील कारवाईसाठी इस्रायलचे हजारो जवान या भागात तैनात असून अजून नऊ हजार राखीव जवान लवकरच दाखल होणार असल्याचे इस्रायलने जाहीर केले. पण प्रत्यक्षात तशी कारवाई केली नाही. यामुळे आधीच बचावासाठी भुयारांमध्ये दाखल झालेले हमासचे दहशतवादी इस्रायलच्या घणाघाती हल्ल्यात ठार झाले.

हमासचा एक प्रमुख नेता या हल्ल्यातून बचावल्याची माहिती इस्रायली पंतप्रधानांनी दिली. यावेळी तो वाचला तरी पुढच्या काळात त्याला लक्ष्य केले जाईल, असे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी म्हटले आहे.

leave a reply