सिरियाच्या शहरावर इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले

- सिरियन वृत्तसंस्थेचा आरोप

बैरूत – सिरियाच्या हमा प्रांतातील मसयाफ भागात इस्रायलने क्षेपणास्त्रांचा मारा केला. यातील काही क्षेपणास्त्रे सिरियाच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने भेदली, अशी माहिती सिरियाच्या सना या राष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिली. इस्रायलने या बातमीवर प्रतिक्रिया नोंदविलेली नाही. मात्र सिरियामधील इराणसंलग्न दहशतवादी गटांवर इस्रायल हल्ले चढवित राहिल, असे या देशाने आधीच घोषित केले होते.

सिरियाच्या शहरावर इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले - सिरियन वृत्तसंस्थेचा आरोपमासयाफमध्ये पहाटेच्या सुमारे इस्रायलने हा क्षेपणास्त्रांचा मारा केला. आपल्या हवाई सुरक्षा यंत्रणेने यातील काही क्षेपणास्त्रे भेदली असली तरी यातील काहींचा स्फोट झाला असून त्याचे फोटोग्राफ्स सिरियाच्या सना वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहेत. तसेच या हल्ल्यात कुठल्याही प्रकारची जीवित तसेच इतर प्रकारची हानी झालेली नाही, असे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

दरम्यान, सिरियातील गृहयुद्धाचा लाभ घेऊन इराण या देशात हिजबुल्लाह तसेच आपल्याशी संलग्न असलेल्या इतर दहशतवादी गटांचे तळ विकसित करीत आहे. त्यांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा करून अखेरीस इस्रायलवर हल्ला चढविण्यासाठी या दहशतवादी गटांचा वापर करण्याची इराणची योजना असल्याचा ठपका इस्रायलने ठेवला होता.

काहीही झाले तरी सिरियाला इराणचा लष्करी तळ बनू देणार नाही, असे सांगून इस्रायलने सिरियात घणाघाती हल्ले सुरू केले होते. या हल्ल्यांचे तपशील इस्रायलने कधीही उघड केले नव्हते. मात्र इस्रायलच्या सिरियातील हिजबुल्लाह व इतर दहशतवाद्यांच्या तळांवर शेकडो हल्ले चढविलेले आहेत, असा दावा इस्रालच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी काही काळापूर्वी केला होता.

हिंदी

 

leave a reply