५०० टन वजन असलेले आयएसएसचा वापर करून अमेरिका भारत व चीनला धमकावत आहे का?

- रशियाच्या अंतराळ संस्थेच्या प्रमुखांचा सवाल

आयएसएसमॉस्को – युक्रेनवर हल्ला चढविल्यानंतर रशियावर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. यामध्ये रशियन अर्थव्यवस्थेला लक्ष्य करण्याबरोबरच रशियाची अंतराळ क्षेत्रातील क्षमता संपविण्याचेही प्रयत्न केले जातील, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले होते. याचा अर्थ ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन-आयएसएस’साठ अमेरिका व रशियाने केलेले सहकार्यही संपुष्टात येईल का? याद्वारे ५०० टन वजनाचे हे ‘आयएसएस’ भारत किंवा चीनमध्ये कोसळू शकते, असे संके देऊन रशियाच्या या दोन्ही सहकारी देशांना अमेरिका धमकावत आहे का? असा सवाल रशियाने केला आहे.

युक्रेनच्या प्रश्‍नावर भारताने रशियाच्या विरोधात भूमिका स्वीकारावी, यासाठी अमेरिकेचे बायडेन प्रशासन भारतावर दबाव टाकत आहे. मात्र भारताने त्याला स्पष्टपणे नकार देऊन या प्रकरणी तटस्थ भूमिका स्वीकारली. रशियाने याचे स्वागत केले. वरकरणी अमेरिकेच्या भारताबरोबरील सहकार्याचा, भारताच्या रशियाबरोबरील सहकार्याशी संबंध नसल्याचे सांगून अमेरिका ही बाब आपल्याला मान्य असल्याचे सांगत आहे. पण प्रत्यक्षात भारताचा तटस्थपणा रशियाला अनुकूल ठरणारी बाब असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या काही आयएसएसलोकप्रतिनिधींनी नोंदविलेल्या प्रतिक्रियेतून ही बाब उघड होत आहे.

अशा परिस्थितीत ‘आयएसएस’बाबचे रशियाबरोबरील अमेरिकेचे सहकार्य संपुष्टात येईल, असे संकेत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून दिले जात आहेत. यावर रशियाने बोट ठेवले आहे. याचा अर्थ आयएसएस बाबत अमेरिका रशियाला सहकार्य करणार नाही, असा असेल तर मग अंतराळातील निकामी उपग्रहांच्या कचर्‍यापासून आयएसएसची सुरक्षा कोण करणार? या अपघातामुळे आयएसएस पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता आहे. पण आयएसएस रशियावर आदळू शकत नाही, ते अमेरिकेवर किंवा युरोपवर आदळले तर काय कराल? त्याला तोंड देण्याची अमेरिकेने तयारी केली आहे का, असे प्रश्‍न रशियन अंतराळ संस्थेचे प्रमुख दिमित्री रोगोझिन यांनी केले आहेत. ५०० टन वजनाचे आयएसएस भारत किंवा चीनवर आदळण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात आणून देऊन रशियाला सहकार्य करणार्‍या भारत व चीनला अमेरिका धमकावत आहे का? असा सवाल रोगोझिन यांनी केला आहे.

leave a reply