आयटी आणि बीपीओ कंपन्यांना ३१ डिसेंबरपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’

IT-BPO-Companiesनवी दिल्ली – देशात कोरोनाव्हायरसचा वेगाने प्रसार होत असल्यामुळे, दूरसंचार मंत्रालयाने आयटी आणि बीपीओ कंपन्यांना ३१ डिसेंबरपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना दिल्या आहेत. याआधी ३१ जुलैपर्यंत ही मुभा देण्यात आली होती. आयटी कंपन्यांचे ८५ टक्के काम घरातून होत असल्याचे दूरसंचार मंत्रालयाने म्हटले.

मार्च महिन्यात कोरोनाव्हायरसची साथीचा फैलाव सुरु झाल्यानंतर आयटी आणि बीपीओ कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना करण्यात आल्या होत्या. सुरुवातीला हा कालावधी काही दिवसांपुरता होता. त्यानंतर ३१ जुलैपर्यंत हा कालावधी वाढविण्यात आला. आता दूरसंचार मंत्रालयाने ३१ डिसेंबरपर्यंत आयटी आणि बीपीओ कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना दिल्या.

leave a reply