इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळावर कत्युशा रॉकेटचे हल्ले

बगदाद – इराकमधील अमेरिकेचे हवाईतळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अल-असाद येथे पाच रॉकेट्सचे हल्ले झाले. अमेरिकी जवान तैनात असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर हे रॉकेट्स कोसळले. त्यामुळे अमेरिकी जवान या रॉकेट्सच्या निशाण्यावर होते, असा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत. तर यासाठी कत्यूशा रॉकेट्सचा वापर झाल्याचे इराणच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. त्यामुळे इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी गट या हल्ल्यामागे असल्याची शक्यता वर्तविण्यात येते.

इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळावर कत्युशा रॉकेटचे हल्लेवर्षभरापूर्वी सैन्यमाघार घेतल्यानंतर इराकच्या काही भागात अमेरिकेचे साडे तीन हजार जवान अल्पसंख्येत तैनात आहेत. यामध्ये इराकच्या पश्चिमेकडील अल अन्बर प्रांत तसेच ईशान्येकडील कुर्दिस्तान प्रांतात अमेरिकी जवानांची तैनाती आहे. इराकी लष्कराला सल्ले देण्यासाठी ही तैनाती असेल, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. पण अमेरिकेने आमच्या देशातून पूर्ण माघार घ्यावी, अशी मागणी इराकमधील इराणसंलग्न राजकीय तसेच सशस्त्र गट करीत आहेत.

यातूनच ‘पॉप्युलर मोबिलायझेशन युनिट्स-पीएमयू’ ही इराणसंलग्न दहशतवादी संघटना इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले चढवित असल्याचे याआधी उघड झाले आहे. अमेरिकेनेच इराकमधील आपल्या जवानांवरील हल्ल्यांसाठी पीएमयूला जबाबदार धरले होते. तर इराणने अमेरिकी जवानांवरील या हल्ल्यांचे समर्थन केले होते.

leave a reply