सुदानची राजधानी खार्तूम पुन्हा हवाईहल्ल्यांनी हादरली

- महिन्याभरातील संघर्षात 11 लाखांहून अधिक नागरिक विस्थापित

खार्तूम – सुदानची राजधानी खार्तूम पुन्हा एकदा हवाईहल्ल्यांनी हादरली आहे. शुक्रवारी रात्रीपासून राजधानी खार्तूम व नजिकच्या भागात हवाईहल्ले सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लष्कराची लढाऊ विमाने व निमलष्करीदलांचे हेलिकॉप्टर्स खार्तूममधील परस्परांच्या ठिकाणांना लक्ष्य करीत असल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यांमुळे राजधानीतील काही भागांमध्ये आगी लागल्याचे तसेच धुराचे मोठे लोट दिसत असल्याचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध झाले आहेत. नव्या हवाईहल्ल्यांनी सुदानच्या दोन विरोधी गटांमध्ये संघर्षबंदी घडविण्यासाठी चाललेले प्रयत्न अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुदानची राजधानी खार्तूम पुन्हा हवाईहल्ल्यांनी हादरली - महिन्याभरातील संघर्षात 11 लाखांहून अधिक नागरिक विस्थापित2021 साली सुदानमधील सरकारविरोधात बंडाळी करणारे लष्करप्रमुख जनरल बुरहान आणि निमलष्करीदलाचे प्रमुख जनरल दागालो यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र बनला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिका, सौदी अरेबिया, संयुक्त राष्ट्रसंघ व आफ्रिकन महासंघ, अरब लीग यांनी दोन विरोधी गटांमध्ये समेट घडविण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र त्याला यश मिळाले नसून उलट हल्ले अधिक प्रखर होत असल्याचे दिसत आहे.

लष्कर व निमलष्करीदल या दोन्ही बाजू सुदानवरील ताबा सोडायला तयार नाही. तसेच सुदानमधील या संघर्षात आपणच विजय ठरू, असा दावा दोन्ही दलांचे प्रमुख थांबविण्यासाठी कुठलाही गट पुढाकार घ्यायला तयार नाही. एक महिन्याहून अधिक काळ उलटल्यानंतरही सुदानमध्ये सुरू असलेले गृहयुद्ध लवकर संपुष्टात येणार नसल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत. तर पाश्चिमात्य देश सुदानमधील संघर्ष सोडविण्यासाठी लष्कर व निमलष्करीदलावर योग्य दडपण आणत नसल्याची तक्रार माध्यमे व मानवाधिकार संघटना करीत आहेत.सुदानची राजधानी खार्तूम पुन्हा हवाईहल्ल्यांनी हादरली - महिन्याभरातील संघर्षात 11 लाखांहून अधिक नागरिक विस्थापित

दरम्यान, एक महिन्याहून अधिक काळ सुरू असलेल्या संघर्षामुळे देशातील विस्थापितांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. आतापर्यंत सुदानमधील जवळपास 11 लाख नागरिकांना विस्थापित होणे भाग पडल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघटनेने दिली. तर या गृहयुद्धात बळी पडलेल्यांची संख्या साडेआठशेच्या नजिक पोहोचली असून तीन हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत. सुदानमधील ‘डॉक्टर्स युनियन’कडून ही माहिती देण्यात आली आहे.

हिंदी English

 

leave a reply