लिबियाच्या बंडखोर नेत्याची इस्रायलला अघोषित भेट

- इस्रायली माध्यमांचा दावा

बंडखोरजेरूसलेम/त्रिपोली – लिबियातील बंडखोर नेते खलिफा हफ्तार यांच्या विमानाने सायप्रसमार्गे इस्रायलचा प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लिबियन बंडखोर नेत्याने इस्रायलच्या नेत्यांची भेट घेतल्याच्या बातम्यांना उधाण आले होते. काही दिवसांपूर्वी लिबियाचे हंगामी पंतप्रधान अब्दुलहमीद मोहम्मद अल-दाबैबा यांनी जॉर्डनमध्ये इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांची भेट घेतल्याची बातमी समोर आले होती. त्या पार्श्‍वभूमीवर लिबियाच्या सत्ताधारी तसेच विरोधीगटाच्या नेत्यांचा हा इस्रायल दौरा लक्षवेधी ठरतो.

बंडखोरलिबियाचे माजी हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांची राजवट कडवी इस्रायलविरोधी होती. गद्दाफी यांनी इस्रायलविरोधी युद्धासाठी आपले लष्करही रवाना केले होते. पण लिबियातील विद्यमान सरकार आणि विरोधी गट, दोघेही इस्रायलशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे संकेत मिळत आहेत. याआधी लिबियन बंडखोर नेते जनरल हफ्तार यांच्या प्रवक्त्याने इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे म्हटले होते.

तर गेल्या नोव्हेंबर महिन्यात जनरल हफ्तार यांचा मुलगा आणि लिबियातील बंडखोर संघटनेचा दुसर्‍या क्रमांकाचा नेता सद्दाम याने देखील इस्रायलचा छुपा दौरा केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

leave a reply