अमेरिकेच्या कोलोरॅडो प्रांतातील मास शूटिंगच्या घटनेत १० जणांचा बळी

- ‘गन कंट्रोल’चा मुद्दा ऐरणीवर

कोलोरॅडोवॉशिंग्टन – अमेरिकेच्या कोलोरॅडो प्रांतात सोमवारी करण्यात आलेल्या बेछूट गोळीबाराच्या घटनेत एका पोलिस अधिकार्‍यासह १० जणांचा बळी गेला. गेल्या सात दिवसात अमेरिकेत घडलेली ही मास शूटिंगची दुसरी घटना आहे. सोमवारी कोलोरॅडोमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत २१ वर्षाचा अहमद अलिसा हा तरुण प्रमुख संशयित असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र हल्ल्यामागील उद्देश स्पष्ट करण्यात आलेला नाही.

सोमवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास कोलोरॅडो प्रांतातील बोल्डर भागात असलेल्या ‘किंग सुपर्स’ या दुकानात गोळीबाराला सुरुवात झाली. जवळपास २० मिनिटे अहमद अलिसाकडून बेछूट गोळीबार सुरू होता. हल्ल्यासाठी कोलोरॅडोत्याने ‘एआर-१५ रायफल’चा वापर केल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोळीबार सुरू असतानाच स्थानिक पोलिस अधिकारी एरिक टॅली यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोराला प्रत्युत्तर देताना झालेल्या चकमकीत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली.

दुपारी साडेतीनच्या सुमारास हल्ला रोखण्यात सुरक्षायंत्रणांना यश आले. यावेळी एका जखमी व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तोच संशयित हल्लेखोर असावा, असे सांगण्यात येते. मात्र पोलिसांनी यासंदर्भात अधिक माहिती देण्याचे टाळले. कालांतराने हल्लेखोराचे नाव अहमद अलिसा, असे जाहीर करताना त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे, एवढीच माहिती देण्यात आली आहे. हल्ल्यात बळी पडलेल्यांमध्ये सर्व अमेरिकी नागरिक असून ते २० ते ६५ वयोगटातील असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना हल्ल्याची माहिती देण्यात आली असून ते लवकरच निवेदन प्रसिद्ध कोलोरॅडोकरतील, असे सूत्रांनी सांगितले. या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेतील ‘गन कंट्रोल’चा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे संकेत मिळत आहेत. स्थानिक संसद सदस्य जो नेग्युस यांनी, आता अमेरिकी जनता ‘गन कंट्रोल’ विरोधातील अडथळ्यांना कंटाळल्याचा दावा केला. संसदेत ठामपणे उभे राहून राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याची वेळ आली आहे, असेही नेग्युस यांनी बजावले. ऍरिझोनाच्या माजी संसद सदस्य गॅब्रिएल गिफॉर्डस् यांनी, ‘गन कोलोरॅडोकंट्रोल’विरोधात ठोस कारवाईची वेळ अमेरिकी नेतृत्त्वाच्या हातून निघून गेली आहे, असा टोला लगावला.

अमेरिकेत गेल्या आठवड्याभरात घडलेली ‘मास शूटिंग’ची ही दुसरी घटना आहे. गेल्या आठवड्यात अटलांटामध्ये एका तरुणाने ‘स्पा’मध्ये केलेल्या गोळीबारात आठजणांचा बळी गेला होता. त्यानंतर घडलेल्या या घटनेने राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर ‘गन कंट्रोल’च्या मुद्यावर ठोस पावले उचलण्यासाठी अधिक दडपण आणल्याचे मानले जाते. अमेरिकेतील सत्ताधारी डेमोक्रॅटस् त्यासाठी आग्रही असले तरी रिपब्लिकन पार्टीने त्याला तीव्र विरोध दर्शविला आहे. ‘गन कंट्रोल’साठी कठोर निर्बंध लादणे हे अमेरिकी घटनेतील तरतुदीच्या विरोधात असल्याचा दावा रिपब्लिकन पक्षाकडून करण्यात येतो.

leave a reply