तुर्कीच्या सीमेजवळ रशिया व सिरियाचे हवाई हल्ले

- अमेरिका व संयुक्त राष्ट्रसंघाची टीका

हवाई हल्लेबैरूत/वॉशिंग्टन – सिरियातील अस्साद राजवटीला आव्हान देणार्‍या तुर्कीसंलग्न दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर रशिया व सिरियाने रविवारी हवाई हल्ले चढविले. या कारवाईत सात जणांचा बळी गेला तर तस्करीसाठी वापरले जाणारे ट्रक्स नष्ट झाले. रशिया व सिरियाच्या या कारवाईवर संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिकेने टीका केली आहे. तुर्कीनेही रशियाला हे हल्ले रोखण्याचे आवाहन केले आहे.

सिरियाच्या वायव्येकडील इदलिब प्रांतात रशिया व सिरियाने रविवारी हल्ले चढविले. तुर्कीच्या सीमेजवळील बाब अल-हावा या ठिकाणी रशियाने हल्ले चढविल्याचा दावा केला जातो. येथील सीमेंट फॅक्टरी आणि काही शहरांना रशियन लढाऊ विमानांनी लक्ष्य केल्याचा आरोप तुर्कीसंलग्न दहशतवादी व स्थानिक करीत हवाई हल्लेआहेत. यावेळी रशियाने काह शहरात जमिनीवरुन जमिनीवर हल्ले चढविणार्‍या क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचा दावाही केला जातो. या व्यतिरिक्त सिरियानेही येथील रुग्णालयावर तोफगोळे डागल्याचा आरोप होत आहे.

हवाई हल्लेरशिया व सिरियाने केलेल्या या हल्ल्यांमध्ये सात जणांचा बळी गेला तर १४ जण जखमी झाले. रविवारच्या या हल्ल्यांवर अमेरिका व संयुक्त राष्ट्रसंघाने टीका केली आहे. तुर्कीच्या सीमेजवळ आश्रय घेणार्‍या निर्वासितांची सुरक्षा यामुळे धोक्यात आल्याचे ताशेरे राष्ट्रसंघाने ओढले आहेत. तर सिरियामध्ये संपूर्णरित्या संघर्षबंदी लागू करण्यात यावी, अशी मागणी अमेरिकेने केली आहे.

तुर्कीने देखील आपल्या सीमेजवळ सुरू असलेल्या या कारवाईवर टीका करून रशियाने सदर हल्ले थांबवावे, असे आवाहन केले आहे. त्याचबरोबर तुर्कीने आपल्या लष्कराला सज्ज राहण्याचे आदेशही दिले आहेत. पण रशियावर टीका करणार्‍या तुर्कीने सिरियाच्या उत्तरेकडील कुर्दांच्या ठिकाणांवर हल्ले चढविल्याची माहिती समोर येत आहे. कुर्दांचे वर्चस्व व इंधनसंपन्न असलेल्या ‘एन इसा’ या भागात तुर्कीने हवाई हल्ले चढविले आहेत.

दरम्यान, गेल्या चोवीस तासात ‘जबात अल-नुस्र’ या ‘आयएस’ संलग्न दहशतवादी संघटनेने ४० वेळा संघर्षबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. यामध्ये लताकिया प्रांतात १७ तर इदलिब प्रांतात १६ वेळा आणि अलेप्पो व हमा प्रांतात सात वेळा संघर्षबंदी मोडण्यात आल्याची माहिती रशियाने दिली.

leave a reply