चीन-जपानमध्ये लष्करी हॉटलाईन व्यवस्था सुरू

बीजिंग – वादग्रस्त द्वीपसमुहांच्या मुद्यावरुन निर्माण होणारे सागरी तसेच हवाई वाद सोडविण्यासाठी चीन व जपानमध्ये लष्करी हॉटलाईन व्यवस्था सुरू झाली आहे. यामुळे ईस्ट चायना सीमधील वाद सोडविता येतील, असा विश्वास दोन्ही देशांनी व्यक्त केला. जपानचे परराष्ट्रमंत्री योशिमासा हयाशी पुढच्या आठवड्यात चीनचा दौरा करणार आहेत. त्याआधी चीनने सदर संपर्क व्यवस्था सुरू केली आहे.

चीन-जपानमध्ये लष्करी हॉटलाईन व्यवस्था सुरूसेंकाकू द्वीपसमुह, ईस्ट चायना सी तसेच हवाई क्षेत्राच्या मुद्यावरुन चीन व जपानमध्ये मोठे मतभेद आहेत. सेंकाकूसह जपानच्या सागरी तसेच हवाई क्षेत्रावरही चीनने आपला अधिकार सांगितला आहे. त्यामुळे दोन्ही शेजारी देशांमध्ये तणाव वाढला आहे. हा तणाव कमी करण्यासाठी चीन व जपानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली होती. यामध्येच चीन-जपानमधील लष्करी हॉटलाईन व्यवस्था सुरू करण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार शुक्रवारी सदर व्यवस्था बसविण्यात आली.

पुढच्या आठवड्यात चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग आणि जपानचे परराष्ट्रमंत्री योशिमासा हयाशी यांच्यात विशेष बैठक पार पडणार आहे. त्याआधी चीनने ही संपर्क व्यवस्था सुरू करून जपानबरोबर संबंध सुधारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा केला आहे.

leave a reply