तैवानच्या राष्ट्राध्यक्षा मध्य अमेरिकेत दाखल

- चीनच्या दहा विमानांची तैवानच्या आखातात घुसखोरी

मेक्सिको सिटी/तैपेई – चीनच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करून तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन सुरुवातीला अमेरिका व शुक्रवारी उशीरा मध्य अमेरिकेच्या ग्वातेमालामध्ये दाखल झाल्या. यावेळी तैवानला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा देणाऱ्या ग्वातेमालाबरोबर सहकार्य वाढविण्यावर राष्ट्राध्यक्षा इंग-वेन महत्त्व देणार आहेत. पण तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या या दौऱ्यामुळे खवळलेल्या चीनने तैवानच्या आखाताच्या दिशेने दहा लढाऊ विमाने रवाना केली.

तैवानच्या राष्ट्राध्यक्षा मध्य अमेरिकेत दाखल - चीनच्या दहा विमानांची तैवानच्या आखातात घुसखोरीराष्ट्राध्यक्षा इंग-वेन आपल्या दहा दिवसांच्या अमेरिका व मध्य अमेरिकेच्या दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत. तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी बुधवार व गुरुवार अमेरिकेचा छोटा दौरा केला. यावेळी राष्ट्राध्यक्षा इंग-वेन यांनी अमेरिकी नेत्यांची भेट घेण्याचे टाळले. पण तैवानसाठी परतण्याआधी राष्ट्राध्यक्षा इंग-वेन पुन्हा अमेरिकेत दाखल होणार आहेत. यावेळी त्या प्रतिनिधीगृहाच्या सभापती केव्हिन मॅकार्थी यांची भेट घेतील. पण त्याआधी शुक्रवारी राष्ट्राध्यक्षा इंग-वेन मध्य अमेरिकेच्या ग्वातेमालामध्ये दाखल झाल्या. तैवानच्या राष्ट्राध्यक्षा मध्य अमेरिकेत दाखल - चीनच्या दहा विमानांची तैवानच्या आखातात घुसखोरीतैवानच्या राष्ट्राध्यक्षांचे ग्वातेमालामध्ये ‘रेड कार्पेट’वर स्वागत झाले.

त्साई इंग-वेन यांचा अमेरिका दौरा व ग्वातेमालातील त्यांच्या स्वागतामुळे चीन अस्वस्थ बनला आहे. शनिवारी चीनने तैवानच्या दिशेने दहा विमाने रवाना केली. यामध्ये नऊ लढाऊ तर एका ड्रोन विमानाचा समावेश होता. या विमानांनी तैवान व चीनला विभागणाऱ्या ‘मिडियन लाईन’ची मर्यादा ओलांडल्याचा आरोप तैवानचे संरक्षण मंत्रालय करीत आहे. आपली लढाऊ विमाने रवाना करून तैवानने चीनच्या विमानांना पिटाळून लावले.

leave a reply