कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी मुंबई लोकलचा प्रवास खुला

मुंबई – गेल्यावर्षी कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांसाठी बंदी घातलेल्या लोकलचा प्रवास आता खुला होणार आहे. मात्र कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस झालेल्यांनाच १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी मिळेल. लोकल प्रवासावरील निर्बंध शिथिल करण्याची मागणी सातत्याने होत होती. लसींचे दोन्ही घेतलेल्यांसाठी तरी लोकल सुरू करा, असे आवाहन करण्यात येत होते. मुंबई उच्च न्यायालयानेही याबाबत राज्य सरकारला विचारणा केली होती. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. तसेच हॉटेल, रेस्ट्रारंट, मॉल व धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही राज्य सरकारने म्हटले आहे.

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी मुंबई लोकलचा प्रवास खुलागेल्यावर्षीपासून आत्याश्यक सेवेतील नागरिकांसाठीच लोकल सेवा सुरू आहे. यासाठी कित्येक जणांना अत्यावश्यक सेवेची बनावट ओळखपत्रे बनविल्याचेही समोर आले होते. त्यानंतर अनेकांवर कारवाई करण्यात आली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर लोकल प्रवासावरील निर्बंध आणखी कडक करण्यात आले. मात्र यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून नागरिकांचा वेळ आणि पैसा यामुळे खूप जास्त प्रमाणात खर्च होत असल्याची तक्रार केली जात होती. काही प्रमाणात सरकारने लोकल प्रवासाबाबतचे निर्बंध शिथिल करायला हवेत, अशी आग्रही मागणी करण्यात येत होती. लोकल प्रवासावरील निर्बंधांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली. यावर सुनवाणी करताना नुकतेच उच्च न्यायालयाने सरकारच्या धोरणांवर बोट ठेवले होते. लसीकरण पुर्ण झाल्यानंतरही नागरिकांना घरातच थांबवे लागणार असेल, तर लसीकरणाचा उपयोग काय? असा सवाल केला होता.

या पार्श्‍वभूमीवर लोकल प्रवासावरील निर्बंध काही अंशी हटविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १५ ऑगस्टपासून दोन्ही डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्यांना लोकल प्रवास करता येईल. अशा प्रवाशांची ओळख पटविण्यासाठी एक ऍप तयार करण्यात आले असून त्याबाबत येत्या एक दोन दिवसात माहिती जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सध्या मुंबईमध्ये दोन्ही लस घेऊन १४ दिवस झालेले १९ लाख जण आहेत. या सर्वांना यामुळे लोकल प्रवास शक्य होणार आहे. तसेच दरदिवशी अशा नागरिकांची संख्या वाढत जाईल. टप्प्याटप्प्याने इतर निर्बंधही खुले करण्यात येतील. याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

leave a reply