रशियाविरोधी युद्धात नाटोमध्येच फूट पडली

- युक्रेनला शस्त्रसज्ज करण्यास नाटोचे सदस्य फ्रान्स, हंगेरीचा नकार

रशियाविरोधी युद्धातबुडापेस्ट – रशियाविरोधी युद्धात युक्रेनचा शस्त्रसाठा मोठ्या प्रमाणात नष्ट झाला आहे. अशा परिस्थितीत, नाटो सदस्य देशांनी युक्रेनला लढाऊ विमाने, हवाई सुरक्षा यंत्रणा व इतर शस्त्रसाठा पुरवावा, अशा सूचना अमेरिका व नाटोकडून दिल्या जात आहेत. पण फ्रान्स व हंगेरी या नाटो सदस्य देशांनीच युक्रेनला शस्त्रसज्ज करण्यास विरोध व्यक्त केला आहे. ‘युक्रेनला रणगाडे आणि लढाऊ विमाने पुरविणे म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखे ठरेल’, असा इशारा फ्रान्सने दिला आहे. तर असा शस्त्रसाठा पुरविल्यास युक्रेनदेखील या युद्धात ओढला जाईल, असा दावा युक्रेनने केला. यावरुन नाटोमध्येच रशिया-युक्रेन युद्धावरुन फूट पडल्याचे दिसत आहे.

अमेरिकेच्या आघाडीचे दैनिक ‘ब्लुमबर्ग’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, फ्रान्सने युक्रेनला शस्त्रसज्ज करण्यास नकार दिला आहे. फ्रेच अधिकार्‍याच्या हवाल्याने अमेरिकन दैनिकाने ही माहिती प्रसिद्ध केली. काही दिवसांपूर्वी हंगेरीचे राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर ऑर्बन यांनी देखील हीच भूमिका स्वीकारली होती. रशिया-युक्रेनचे युद्ध हंगेरीमध्ये नको, अशा स्पष्ट शब्दात ऑर्बन यांनी युक्रेनला शस्त्रसज्ज करण्यास विरोध केला होता. या युद्धात युक्रेनला शस्त्रसज्ज केल्यास रशियाचे हल्ले ओढावून घेण्यासारखे ठरेल, असे सांगून ऑर्बन यांनी अमेरिका व नाटोच्या भूमिकेवर प्रश्‍न उपस्थित केले होते.

रशियाविरोधी युद्धातयानंतर ऑर्बन यांच्यावर युरोपिय देशांनी टीका केली होती. पोलंड आणि झेक प्रजासत्ताकने हंगेरीतील संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत उपस्थित राहण्याचेही टाळले होते. त्यामुळे युक्रेन युद्धावरुन नाटोसदस्य देशांमध्येच मतभेद असल्याचे उघड झाले होते. त्याचबरोबर रशियावर लादलेल्या निर्बंधांवरुनही काही नाटो सदस्य देशांनी आक्षेप घेतला होता. जर्मनीने रशियावरील कठोर निर्बंधांना विरोध केल्याच्या बातम्या आल्या होत्या.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि जर्मनीचे चॅन्सेलर शोल्झ हे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर शांतीचर्चेसाठी संपर्कात असल्याचा दावा ब्लुमबर्गने केला. पण नाटोतील काही देशांना रशियाबरोबरची शांतीचर्चा मान्य नसल्याचेही या दैनिकाचे म्हणणे आहे. सदर शांतीचर्चा रशियाला फायदा देणारी ठरेल, असे सांगून काही नाटो सदस्य देश फ्रान्स व जर्मनीच्या प्रयत्नांना विरोध करीत असल्याचे ब्लुमबर्गने म्हटले आहे.

leave a reply