नौदलाच्या ‘मिग-29के’ विमानाला अपघात

नवी दिल्ली – भारतीय नौदलाच्या ‘मिग-29के’ या प्रशिक्षण विमानाला गुरुवारी सायंकाळी अपघात झाला. हे अपघातग्रस्त विमान अरबी समुद्रात कोसळले. अपघातानंतर यामधील एका वैमानिकाला वाचविण्यात आले असून दुसरा वैमानिक अद्याप गायब आहे. यासाठी नौदलाने शोध मोहिम सुरू केली आहे. गेल्यावर्षीपासून चौथ्या ‘मिग-29’ विमानाला अपघात झाला आहे.

अपघातग्रस्त ‘मिग-29के’ हे विमान ‘आयएनएस विक्रमादित्य’ या विमानवाहू युद्धनौकेवर तैनात होते. अपघाताच्या काही तास आधीच या विमानाने ‘आयएनएस विक्रमादित्य’वरुन नियमित उड्डान केले होते. उड्डाणादरम्यान विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्यानंतर आग लागल्याचे सांगितले जाते. अपघातग्रस्त विमानाच्या दुसऱ्या पायलेटला शोधण्यासाठी नौदलाची टेहाळणी विमाने आणि जहाजे तैनात करण्यात आली आहेत. तसेच घटनेच्या चौकशीचे आदेशही नौदलाने दिले आहेत.

leave a reply