उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

South Korea Koreas Tensionsसेऊल – अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानबरोबर तीव्र मतभेदात सापडलेल्या उत्तर कोरियाने गुरुवारी नव्याने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. जपान आणि दक्षिण कोरियाजवळच्या पूर्वेकडील सागरी क्षेत्रात उत्तर कोरियाचे हे क्षेपणास्त्र कोसळले. या चाचणीआधी उत्तर कोरियाने अमेरिकेला भीषण लष्करी प्रत्युत्तराची धमकी दिली होती.

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने जपान आणि दक्षिण कोरियाबरोबर नव्याने लष्करी सहकार्य प्रस्थापित केले. उत्तर कोरियाचा धोका अधोरेखित करून तीनही मित्रदेशांमध्ये यावर एकमत झाले आहे. उत्तर कोरियाने या लष्करी सहकार्याला लक्ष्य करून अमेरिकेला धमकावले. अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियातील या सहकार्यामुळे कोरियन क्षेत्रात अंदाज करता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. यासाठी उत्तर कोरिया अमेरिकेला अतिशय भीषण लष्करी प्रत्युत्तर देईल, अशी धमकी उत्तर कोरियाने दिली.

याला काही तास उलटत नाही तोच, उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले. या क्षेपणास्त्र चाचणीमुळे कोरियन क्षेत्रात काही तासासाठी तणाव निर्माण झाला होता. गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचणीचा सपाटा लावला आहे.

leave a reply