उत्तर कोरियाने महिन्यातील चौथी क्षेपणास्त्र चाचणी घेतली

सेऊल – उत्तर कोरियाने सोमवारी दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली. गेल्या पंधरा दिवसात उत्तर कोरियाने घेतलेली ही चौथी क्षेपणास्त्र चाचणी ठरते. अमेरिकेने जाहीर केलेल्या निर्बंधानंतरही आपल्या क्षेपणास्त्र चाचणीत फरक पडलेला नसल्याचे उत्तर कोरिया दाखवून देत आहे.

उत्तर कोरियाने महिन्यातील चौथी क्षेपणास्त्र चाचणी घेतलीउत्तर कोरियाने राजधानी प्योंगँगच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन ही क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या संरक्षणदलाने केला आहे. उत्तर कोरियाने या चाचणीचे तपशील जाहीर केलेले नाही. पण लघु पल्ल्याची ही क्षेपणास्त्रे ३८० किलोमीटर अंतरावर सागरी क्षेत्रात कोसळली, अशी माहिती दक्षिण कोरियाच्या संरक्षणदलाने दिली.

उत्तर कोरिया बॅलेस्टिक तसेच हायपरसोनिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेत असल्याचा दावा दक्षिण कोरिया व जपान करीत आहे. चीनमध्ये हिवाळी ऑलिंपिक आणि दक्षिण कोरियामध्ये राष्ट्राध्यक्षीय निवडणूक अवघ्या काही दिवसांवर असताना, उत्तर कोरियाच्या चाचण्या या क्षेत्रातील तणाव वाढवित आहेत.

leave a reply