इस्रायलच्या सिरियातील हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खातमा

- सिरियन मानवाधिकार संघटनेचा दावा

सिरियातील हल्ल्यातबैरूत – इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सिरियातील इराणच्या तळावर चढविलेल्या हल्ल्यात 19 दहशतवादी ठार झाले. यापैकी बहुतांश दहशतवादी पाकिस्तानी असल्याचा दावा सिरियातील मानवाधिकार संघटनेने केला आहे. या आठवड्यात इस्रायलने सिरियात चढविलेला हा तिसरा हल्ला ठरतो. काही दिवसांपूर्वी इराणने सिरियात हल्ले चढविणाऱ्या इस्रायलला अंत जवळ आल्याची धमकी दिली होती. पण गेल्या आठवड्याभरात इस्रायलने सिरियातील हल्ल्यांची तीव्रता वाढवून इराणच्या धमक्यांची आपण पर्वा करीत नसल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले.

सिरियातील हल्ल्यातसिरियाच्या ‘देर अल-झोर’ प्रांतातील ‘अल बुकमल’ या शहरात गुरुवारी पहाटे हवाई हल्ले झाले. इराकच्या सीमेजवळ असलेल्या या ‘अल बुकमल’ शहरातील इराणसंलग्न दहशतवाद्यांच्या ठिकाणावर ही कारवाई झाली. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी चढविलेल्या या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे सिरियातील मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे. या कारवाईत बरेच दहशतवादी गंभीर जखमी झाले असून यामुळे ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या संख्येत भर पडण्याची शक्यताही या ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेने व्यक्त केली.

सिरियातील हल्ल्यातसिरियन सरकार किंवा लष्कर किंवा सरकारी मुखपत्राने ‘अल बुकमल’मधील हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. दोन दिवसांपूर्वीच, मंगळवारी इस्रायली लढाऊ विमानांनी सिरियन राजधानी दमास्कस तसेच दक्षिण सिरियाच्या कुनित्रा प्रांतात हल्ले चढविल्याचा आरोप सिरियन मुखपत्राने केला होता. यामध्ये हिजबुल्लाहचे आठ दहशतवादी ठार झाले होते. तर गेल्या शनिवारी इस्रायली लढाऊ विमानांनी सिरियातील आणखी एका लष्करी ठिकाणावर चढविलेल्या हवाई हल्ल्यात इराक व अफगाणिस्तानातून दाखल झालेल्या 14 इराणसंलग्न दहशतवाद्यांचा खातमा झाला होता. तर त्याआधी इराणच्या कुद्स फोर्सेसचे जवानही इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाले होते. गेल्या आठवड्यातील या हल्ल्यांची माहिती इस्रायली लष्करानेच प्रसिद्ध केली होती. यानंतर संतापलेल्या इराणने इस्रायलला धमकावले होते. सिरियात हल्ले चढवून पळ काढणाऱ्या इस्रायलचा शेवट जवळ येऊन ठेपला असून इस्रायलला याची किंमत चुकती करावी लागेल, अशी धमकी इराणने दिली होती. इराणच्या या धमकीनंतरही इस्रायलने सिरियातील इराणसंलग्न दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर घणाघाती हल्ले चढविण्याचे सत्र सुरू ठेवल्याचे दिसत आहे.

या कारवाईच्या निमित्ताने सिरियातील संघर्षात इराणसंलग्न दहशतवादी गटांमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश असल्याची बाब उघड झाली आहे. यामुळे पाकिस्तान हे जागतिक दहशतवादाचे केंद्र असल्याचा भारताचा आरोप नव्याने सिद्ध झाल्याचे दिसतआहे.

leave a reply