पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायली संरक्षणमंत्र्यांशी भेट

जेरूसलेम – वेस्ट बँकमधील ‘पॅलेस्टिनीयन अथॉरिटी’ अर्थात पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांची भेट घेतली. राष्ट्राध्यक्ष अब्बास यांनी संरक्षणमंत्री गांत्झ यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचे इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. या बातमीमुळे संतापलेल्या हमासने अब्बास यांच्यावर टीका केली. इस्रायली संरक्षणमंत्र्यांची भेट घेऊन अब्बास यांनी पॅलेस्टिनींच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप हमासने केला.

पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांचीऑगस्ट महिन्यात इस्रायली संरक्षणमंत्री गांत्झ यांनी वेस्ट बँकमधील फताह पक्षाच्या मुख्यालयात राष्ट्राध्यक्ष अब्बास यांची भेट घेतली होती. गेल्या कित्येक वर्षांमध्ये इस्रायल व पॅलेस्टाईनच्या नेत्यांमधील ही पहिली भेट ठरली होती. पण यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी पॅलेस्टिनी नेत्यांबरोबर कुठल्याही प्रकारची शांतीचर्चा शक्य नसल्याचे जाहीर केले. यानंतर इस्रायल व पॅलेस्टाईनमध्ये सलोखा प्रस्थापित होणार नसल्याचे बोलले जात होते.

पण मंगळवारी राष्ट्राध्यक्ष अब्बास यांनी रोश हायिन येथील गांत्झ यांच्या घरी जाऊन भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये शांतीचर्चा सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.

leave a reply