युक्रेनमध्ये अमेरिकेच्या 46 जैविक प्रयोगशाळा असल्याची पेंटॅगॉनची कबुली

वॉशिंग्टन – जवळपास तीन महिन्यांच्या नकारघंटानंतर अमेरिकेने युक्रेनमधील आपल्या प्रयोगशाळांची कबुली दिली. गेल्या 20 वर्षांपासून अमेरिका युक्रेनमध्ये 46 जैविक प्रयोगशाळा चालवित असल्याचे, संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने म्हटले आहे. या प्रयोगशाळांचा वापर शांतीपूर्ण आणि नागरी आरोग्य योजनांसाठी केला जात असल्याचा दावा पेंटॅगॉनने केला. त्यामुळे या प्रयोगशाळांमध्ये जैविक शस्त्रांची निर्मिती सुरू असल्याचा रशियाचा आरोप पेंटॅगॉनने फेटाळला.

24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनच्या पूर्वेकडील भागावर हल्ले सुरू केले. यानंतर अमेरिकेने युक्रेनमधील आपल्या प्रयोगशाळांमधील कागदपत्रे नष्ट केली होती. याद्वारे अमेरिकेने जैविक शस्त्रास्त्र निर्मितीचे पुरावे नाहिसे करण्याचा प्रयत्न केला होता. पण यातील काही कागदपत्रे आपल्या हाती लागल्याचे रशियाने म्हटले होते. युक्रेनमधील जैविक प्रयोगशाळांमध्ये प्लेग, अँथ्रॅक्स, कॉलेरा, ट्युलारेमिया आणि काही इतर विषारी विषाणूंवर संशोधन सुरू असल्याचा आरोप रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला होता.

अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या उपमंत्री व्हिक्टोरिया नुलँड यांनी सिनेटच्या सुनावणीसमोर बोलताना समाधानकारक उत्तरे देण्यात अपयशी ठरल्याची टीका झाली होती. यानंतर अमेरिकन सिनेटने पेंटॅगॉनकडे युक्रेनमधील जैविक प्रयोगशाळांबाबत व त्यांना पुरविल्या जाणाऱ्या निधीविषयी विचारणा केली होती. युक्रेनचे युद्ध पेटल्यापासून रशिया करीत असलेले हे आरोप पेंटॅगॉनने फेटाळले होते. मात्र गेल्या आठवड्यात पेंटॅगॉनने प्रसिद्ध केलेल्या ‘फॅक्ट शीट ऑन डब्ल्यूएमडी थ्रेट रिडक्शन एफर्ट्‌‍स’ अहवालात युक्रेनमधील जैविक प्रयोगशाळांची कबुली दिली.

‘गेल्या दोन दशकांपासून अमेरिकेच्या निधीवर युक्रेनमध्ये 46 प्रयोगशाळा, आरोग्य सुविधा आणि रोगलक्षण सूचक केंद्रे सुरू आहेत. अमेरिका या प्रयोगशाळांद्वारे युक्रेनची जैवसुरक्षा मजबूत करणे तसेच मनुष्य आणि प्राण्यांमधील रोगावर निरिक्षण ठेवणे सोपे होते’, असा दावा पेंटॅगॉनने केला. नागरी आरोग्यात सुधारणा आणि कृषी क्षेत्रातील सुरक्षेवर या प्रयोगशाळांचे लक्ष केंद्रीत असल्याची माहिती पेंटॅगॉनने दिली. तसेच जागतिक आरोग्य संघटना-डब्ल्युएचओ यांच्या सहकार्याने सदर प्रयोगशाळांमध्ये काम केले जाते, असे पेंटॅगॉनने आपल्या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, युक्रेनच्या जैविक प्रयोगशाळांमध्ये अमेरिकेने 2005 ते 2022 या कालावधीत 22 कोटी डॉलर्सहून अधिक निधी गुंतविला आहे. या प्रयोगशाळांमध्ये पाश्चिमात्य फार्मास्युटिकल कंपन्या तसेच अमेरिकेचा सत्ताधारी डेमोक्रॅट पक्ष देखील सहभागी असल्याचा आरोप रशियाच्या चौकशी समितीने केला होता. तर ‘युक्रेनमधील 30 प्रयोगशाळांचा वापर शांतीसाठी किंवा वैज्ञानिक उद्दिष्टांसाठी सुरू होता, याबाबत आम्हाला खुलासा नको. तर रशियाच्या सीमेजवळ या प्रयोगशाळांची उभारणी का झाली आणि त्याला अमेरिकेने पैसा कशासाठी पुरविला? त्याचे उत्तर द्या, असा जाब रशियाच्या परराष्ट्र मंत्रालय विचारत आहे.

युक्रेनच नाही तर, सोव्हिएत रशियातून बाहेर पडलेल्या जॉर्जिया, अझरबैजान आणि आर्मेनिया या देशांमध्ये अमेरिकेच्या निधीवर जैविक प्रयोगशाळा सुरू असल्याचा ठपका रशियाने ठेवला

leave a reply