चीनच्या मागणीनुसार फिलिपाईन्स आपल्या गस्तीनौका मागे घेणार नाही – फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ठणकावले

मनिला – ‘फिलिपाईन्सने आपल्याच सागरी हद्दीत दोन विनाशिका तैनात केल्या आहेत. काही झाले तरी या विनाशिका एक इंचही माघार घेणार नाहीत. यासाठी माझा जीव घेतलात तरी चालेल, पण या विनाशिका इथेच तैनात राहतील. या प्रश्‍नावर फिलिपाईन्स-चीन मैत्री तुटू शकेल’, अशा सडेतोड शब्दात फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांनी चीनला ठणकावले.

गस्तीनौका, Philippine President Duterte,china west philippine sea,coast guard ships,फिलिपाईन्स,चीन, China coronavirusगेल्या काही आठवड्यांपासून फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात घुसखोरी केलेल्या मिलिशिया जहाजांवर पाळत ठेवण्यासाठी फिलिपाईन्सने गस्तीनौका तैनात केल्या आहेत. फिलिपाईन्सने या गस्तीनौका माघारी घ्याव्यात, अशी मागणी चीनने केली होती. त्याचबरोबर, चीनने फिलिपाईन्सच्या हद्दीत अतिरिक्त २८७ मिलिशिया जहाजे रवाना केल्या आहेत. या अरेरावीमुळे संतापलेल्या राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी चीनला हा इशारा दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी चीनच्या सुमारे २८७ जहाजांनी फिलिपान्सच्या सागरी क्षेत्रात घुसखोरी केली. कलायान बेटांजवळ चीनची ही मिलिशिया जहाजे विखुरलेली असल्याचा आरोप फिलिपाईन्सच्या टास्क फोर्सने केला आहे. आपल्या सागरी हद्दीतील चीनच्या जहाजांची ही तैनाती बेकायदेशीर असल्याचे फिलिपाईन्सने म्हटले आहे. चिनी जहाजांच्या या घुसखोरीच्या पार्श्‍वभूमीवर, फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष दुअर्ते आणि संरक्षणमंत्री लॉरेन्झा यांच्यात काही तासांपूर्वी बैठक पार पडली. या बैठकीचा ऑडिओ शुक्रवारी प्रसिद्ध झाला.

गस्तीनौका, Philippine President Duterte,china west philippine sea,coast guard ships,फिलिपाईन्स,चीन, China coronavirusयामध्ये राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी चीनच्या विरोधात कठोर भूमिका स्वीकारली आहे. ‘वेस्ट फिलिपाईन्स सी’मधील कलायान आणि मिसचिफ रिफ या बेटांच्या क्षेत्रात फिलिपाईन्सने दोन गस्तीनौका कायमस्वरुपी तैनात केल्या आहेत व या गस्तीनौका याच क्षेत्रात तैनात राहतील, असे स्पष्ट आदेश दुअर्ते यांनी दिले आहेत.

‘वेस्ट फिलिपाईन्स सीमध्ये या दोन गस्तीनौका तैनात आहेत आणि या माघार घेणार नाहीत. चीनला इशारा देण्यासाठीच या दोन्ही गस्तीनौकांची तैनाती केली आहे’, असे फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी या बैठकीत ठासून सांगितले. त्याचबरोबर या विनाशिकांच्या माघारीसाठी चीनने आपल्यावर कितीही दबाव टाकला तरी गस्तीनौका या क्षेत्रातून एक इंचभरही माघार घेणार नसल्याचे राष्ट्राध्यक्ष दुअर्ते म्हणाले.

‘ही भूमिका घेतल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, याची मला जाणीव आहे. तरीही मी आत्ता माघार घेणार नाही. तुम्हाला माझा जीव घ्यायचा असेल तर अवश्य घ्या. पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे’, असे सांगून राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी या प्रश्‍नावर चीन-फिलिपाईन्सची मैत्री संपुष्टात येऊ शकेल, असा गंभीर इशारा दिला.

कलायान आणि मिसचिफ रिफ हे दोन्ही बेट वेस्ट फिलिपाईन्स सीच्या स्प्रार्टले द्वीपसमुहांच्या हद्दीत येतात. फिलिपाईन्सच्या पलावान प्रांतापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर ही बेटे आहेत. यापैकी कलायान बेटाचा वापर फिलिपाईन्सन पर्यटनासाठी करीत आहे. तर मिसचिफ रिफ भागात चीनने कृत्रिम बेटांची निर्मिती करून येथे लष्करी तळ उभारले आहे. अशा परिस्थितीत, फिलिपाईन्सच्या गस्तीनौकांमुळे अस्वस्थ झालेल्या चीनने दुअर्ते सरकारला सदर तैनाती मागे घेण्याची सूचना केली होती.

काही दिवसांपूर्वीच स्प्रार्टले द्वीपसमुहांच्या हद्दीत येणार्‍या थिटू बेटावर फिलिपाईन्सने सुसज्ज मिलिटरी हब अर्थात लष्करी केंद्र उभारण्याची घोषणा केली होती. इतर देशांच्या मिलिशिया जहाजांवर नजर ठेवण्यासाठी या लष्करी केंद्राचा वापर होईल, असा दावा फिलिपाईन्सच्या लष्करप्रमुखांनी केला होता. थिटू बेटावरील फिलिपाईन्सचे लष्करी केंद्र या क्षेत्रातील चीनच्या हालचालींसाठी आव्हान ठरू शकतो. त्यातच फिलिपाईन्सने दोन गस्तीनौका या क्षेत्रात तैनात केल्यामुळे चीनची बेचैनी वाढली आहे.

दरम्यान, मार्च महिन्यापासून चीनची सुमारे २०० मिलिशिया जहाजांनी फिलिपाईन्सच्या फिलिपाईन्सच्या जुआन फिलिप बेटाच्या हद्दीत घुसखोरी केली होती. खराब हवामामुळे आपल्या ३४ मच्छिमार नौकाच या भागात उभ्या असल्याचा दावा चीन करीत आहे. चीनच्या या मिलिशिया नौकांवरही पाळत ठेवण्याचे आदेश फिलिपाईन्सने आपल्या नौदल व हवाईदलाला दिले आहेत.

leave a reply