लडाखमधील पोलिसांना मिळाली स्वतंत्र ओळख

लेह – जम्मू-काश्मीर पोलीस म्हणून ओळखले जाणारे केद्राशासित प्रदेश लडाखमधील पोलीस आता “लडाख पोलीस’ म्हणून ओळ्खले जातील. लडाखचे पोलिस महानिरीक्षक एस. एस. खंदारे यांनी एका आदेशान्वये या बाबाबत माहिती दिली. नवीन आदेशानुसार साइन बोर्ड, पोलिस वाहने, लेटर हेड्स, अधिकृत स्टेशनरी, मुद्रांक आणि इतर वस्तू ज्या ठिकाणी ‘जम्मू-काश्मीर’ लिहिले आहे त्या ठिकाणी लडाख पोलीस म्हणून उल्लेख करण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे.

गेल्यावर्षी ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने संसदेत जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून या राज्याला दोन केंद्रशासित प्रदेशात विभागले होते. लडाखला स्वत्रंत केंद्राशासीत प्रदेश म्हणून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता लडाखमधील पोलिसांना स्वत्रंत ओळख देण्यात आली आहे. नवीन आदेशानुसार लडाखमधील पोलीस विभागातील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या युनिफॉर्मवर जम्मू-काश्मीर पोलिसांच्या गणवेशावर असलेले कॉलर प्रतीक वापरणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

पोलिस मुख्यालयाने जम्मू-काश्मीर पोलीस हे नाव काढून त्याऐवजी लडाख पोलीस असा बदल करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान सर्व वस्तू. कागद पत्र यावरील नाव बदलण्यात यावे असे सांगण्यात आले आहे. मात्र त्यासाठी एक महिन्याचा अवधी लागेल असे खंडारे म्हणाले.

leave a reply