रशिया-युक्रेन युद्धाची अखेर केवळ राजनैतिक वाटाघाटीनेच होईल

- युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा दावा

राजनैतिककिव्ह – रशियाविरोधातील युद्ध रक्तरंजित असेल, ते अजून काही काळ सुरू राहिल. पण या युद्धाची अखेर केवळ राजनैतिक मार्गानेच होऊ शकते असा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केला. रशियाकडून डोन्बासच्या ताब्यासाठी सुरू असलेल्या प्रखर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांनी सदर वक्तव्य केल्याने त्याकडे लक्ष वेधले गेले आहे.

युक्रेनच्या मारिपोल शहरावर रशियाने पूर्ण नियंत्रण मिळविले आहे. रशिया-युक्रेन युद्धात रशियाला मिळालेले हे मोठे यश मानले जाते. या यशाच्या पार्श्वभूमीवर आता रशियाने डोन्बास क्षेत्रावर पूर्ण ताबा मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी आक्रमक व सातत्यपूर्ण हल्ले सुरू आहेत. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडूनही याची कबुली देण्यात आली आहे. रशियन फौजांनी जोरदार हल्ले करून डोन्बासची प्रचंड हानी केल्याचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले होते.

राजनैतिकमारिपोलनंतर येत्या काही दिवसात युक्रेन डोन्बास क्षेत्राचा ताबा मिळवेल, असे संकेत मिळत आहेत. डोन्बासवरील ताब्यानंतर रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यता काहीजणांकडून वर्तविण्यात आली आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी राजनैतिक मार्गाने युद्धाची अखेर करण्याबाबत केलेले विधान त्याचे संकेत देणारे आहे, असाही दावा करण्यात येतो.

राजनैतिकसध्या रशिया व युक्रेनमधील चर्चा पूर्णपणे बंद आहे. यावरून दोन्ही देशांनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोपही केले आहेत. रशियाला शांतता नको असल्याचा आरोप युक्रेनकडून करण्यात आला आहे. तर युक्रेन अमेरिका व ब्रिटनच्या नियंत्रणाखाली असून पाश्चिमात्य देशांना रशियाला कमकुवत केल्याशिवाय युद्ध थांबवायचे नाही, असे रशियन नेत्यांचे म्हणणे आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी राजनैतिक मार्गाचा उल्लेख करताना मारिपोलमधील युक्रेन जवानांच्या सुटकेकडे लक्ष वेधले आहे. तसेच युद्ध थांबविण्याबाबतची चर्चा दोन देशांच्या राष्ट्राध्यक्षांदरम्यानही होऊ शकते, असेही संकेत दिले आहेत.

leave a reply