श्रीहरीकोटामध्ये खाजगी क्षेत्राला स्वतःचे लाँचपॅड उभारता येईल

- इस्रो प्रमुख के. सिवन

नवी दिल्ली – भारतीय अंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आल्यानंतर आता श्रीहरीकोटा येथे खाजगी क्षेत्राला स्वःताचे लाँचपॅड उभारण्यास परवानगी देण्यात येईल असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के. सिवन यांनी म्हटले आहे.

ISROअंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्राचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आल्याने या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या खाजगी कंपन्यांना रॉकेट आणि उपग्रह बनविण्याची परवानगी मिळणार आहे. त्यातच आता लॉंचपॅड उभारण्यास पररवानगी देण्यात आल्याने खाजगी कंपन्या स्पेसक्राफ्ट आणि रॉकेट लॉँच करू शकतील.

खाजगी क्षेत्राला लॉंचपॅड सुरु करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. इतकेच नाही तर खाजगी क्षेत्राला इस्रोच्या तज्ज्ञांचे सहकार्य मिळेल. सध्या इस्रोकडे दोन लॉंचपॅड आणि रॉकेट तयार करण्यासाठी दोन इमारती आहेत. इस्रोकडून नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटर’ या नव्या एजन्सीची स्थापना करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सध्या ही प्रक्रिया सुरु असली तरी त्यामुळे खाजगी क्षेत्राने त्यासाठी वाट पाहू नये. खाजगी कंपन्या उत्सुक असल्यास या कंपन्या इस्रोच्या जागेचा वापर करण्यासाठी अर्ज करू शकतात, असे सिवन म्हणाले.

भारतीय अंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आल्यास भारतीय अंतराळ क्षेत्रात मोठी प्रगती होईल. मागील काही वर्षात यशाचे एक एक टप्पे पार करणाऱ्या इस्रोने अंतराळ क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. खाजगी क्षेत्राच्या सहभागामुळे पुढील काळात ‘जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत’ भारतीय उदयॊगांची महत्वाची भूमिका असेल, असे काही दिवसांपूर्वीच इस्रो प्रमुख के. सिवन यांनी म्हटले होते.

leave a reply