चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशमध्ये ‘रफायल’चा सराव

नवी दिल्ली – अतिप्रगत रफायल विमानांचा पहिला ताफा दोन आठवड्यांपूर्वी भारतात दाखल झाला होता. अंबाला येथील वायुसेनेच्या तळावर तैनात ही लढाऊ विमाने आता सक्रिय झाली आहेत. हिमाचल प्रदेशाच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये ही विमाने रात्रीची उड्डाणे घेत सराव करीत असल्याच्या बातम्या आहेत. कोणत्याही परिस्थितीसाठी तयार रहा, असे आदेश सरकारने तीनही संरक्षण दलांना दिला आहे. यापार्श्वभूमीवर संभाव्य संघर्षसाठी तयार राहण्यासाठी हा सराव केला जात असल्याच्या बातम्या आहेत.

'रफायल'

चीनबरोबर तणाव विकोपाला गेला असताना फ्रान्सकडून मिळालेल्या पाच रफायल विमानांच्या ताफ्याने वायुसेनेची क्षमता प्रचंड वाढविली आहे. ‘गेम चेंजर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या विमानांचा ताफा भारतात दाखल झाल्यावर काही दिवसातच ही विमाने वायुसेनेत सक्रिय झाली आहेत. ही विमाने सध्या हिमाचल प्रदेशाच्या पर्वतीय भागांमध्ये रात्रभर उड्डाण घेत असून वायुसेनेचे वैमानिक याद्वारे सराव करीत आहेत.

हिमाचल प्रदेशमध्येही भारत-चीन सीमा लागून आहे. मात्र सध्या सीमेपासून अंतर राखून रफायलचा सराव सुरु आहे. रफायल विमानांचा ताफा अकस्मित हल्ल्यासाठी सज्ज राहावा हा या सरावामागील उद्देश आहे. मात्र हा सराव चीनला संदेश देणारा असल्याचा दावा केला जात आहे. पण अक्साई चीनमध्ये अक्साई चीनमध्ये तैनात चीनच्या रडार यंत्रणा या विमानांची फ्रीक्वेंसी सिग्नेंचर पकडू नयेत, यासाठी सीमेपासून थोडा दूरवर हा सराव करण्यात येत असल्याचा दावा वृत्त अहवालात करण्यात आहे.

अक्साई चीनमध्ये चीनने तैनाती वाढविली असून यापार्श्वभूमीवर नुकतेच भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील लढाऊ हेलिकॉप्टर्स चिनुकने दौलत बेग ओल्डी आणि काराकोरम पास जवळ सीमेजवळून उड्डाण केल्याच्या बातम्या आल्या होत्या. याद्वारे भारतीय वायुसेनेच्या क्षमतेची जाणीव चीनला करून देण्यात आली होती.

दोनच दिवसांपूर्वी यूरोपीय फाउंडेशन फॉर साउथ एशियन स्टडीज (इएफएसएएस) या अमेरिकेच्या अभ्यास गटाने भारताने चीन विरोधात एकटेच खडे ठाकण्याची आपली क्षमता दाखविल्याचा दावा केला होता. चीनविरोध क्वाडचा पर्याय अमेरिकेने दिला आहे. मात्र केवळ भारताने एकट्यानेच दाखविलेल्या आक्रमकतेमुळे चीनला हैराण केले आहे, असे या अभ्यास गटाचे म्हणणे आहे.

leave a reply